सोलापूर : श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी ५०४ ट्रक कांद्याची आवक झाली होती. मागील काही दिवसांपासून कांद्याचा दर स्थिरावला आहे.
कमाल दर २३०० ते २४०० रुपये तर सर्वसाधारण दर ११०० प्रति क्विंटल इतका राहिला आहे. मंगळवारी एका दिवसात ५ कोटी ५४ लाख ७७ हजार ४०० रुपयांची उलाढाल झाली आहे.
पुढील दोन महिने मार्केट यार्डात कांद्याची आवक मोठी राहणार आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटकातूनही मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे.
महापुरामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची उशीरा लागवड केली होती, त्यामुळे उन्हाळी कांद्याची आवकही अधिक राहणार असल्याचे सांगण्यात आले.
अधिक वाचा: सोयाबीन बाजारात साडेतीन वर्षाच्या प्रदीर्घ मंदीनंतर स्पर्धा वाढली; दर अजून वाढण्याची शक्यता
