बाजरी हे एक परिपूर्ण धान्य आहे. थंडीत केवळ ऊर्जाच देत नाही, तर त्यातील फायबर आणि लोह प्रतिकारशक्ती वाढवतात. त्यामुळे आठवड्यातून किमान तीन वेळा बाजरीचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.
बाजरीचे आरोग्यासाठी अनेक फायदे असल्याने बाजारी आता केवळ ग्रामीण भागातील अन्न न राहता, शहरी आणि आरोग्यसजग लोकांच्या आहारात एक महत्त्वाचे स्थान मिळवत आहे.
बाजरी खाण्याचे फायदे काय?
• शरीराला उष्णता : बाजरीची प्रकृती उष्ण असल्याने ती थंडीत शरीर आतून उबदार ठेवण्यास मदत करते.
• पचन सुधारते : उच्च फायबरमुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि कोष्ठतेची पचनक्रिया सुरळीत राहते.
• मधुमेह नियंत्रण : फायबरमुळे रक्तातील साखर हळूहळू शोषली जाते, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
• हृदयाचे आरोग्य : हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे.
• अशक्तपणा दूर : लोह भरपूर प्रमाणात असल्याने ॲनिमियाचा धोका कमी होतो.
बाजरीत आहेत ही पोषणमूल्ये
• बाजरी हे एक 'सुपरफूड' मानले जाते. गव्हाच्या तुलनेत अधिक फायबर असते, जे पचनास मदत करते.
• स्नायूंच्या आरोग्यासाठी उत्तम. लोह आणि जस्त यांचे उत्तम स्रोत असल्याने बाजरीला मागणी वाढत आहे.
• थंडीत यापासून बनवलेल्या पदार्थांना विशेष पसंती दिली जाते.
मग! बाजरी खाणे टाळावे
बाजरी अत्यंत पौष्टिक असली तरी काही विशिष्ट परिस्थितीत किंवा लोकांनी ती मर्यादित प्रमाणात खावी किंवा टाळावी. बाजरी उष्ण असल्याने, ज्यांना उष्णतेचा खूप त्रास होतो, त्यांनी ती उन्हाळ्यात किंवा अधिक प्रमाणात खाणे टाळावे.
