दरवर्षी २९ सप्टेंबर रोजी 'जागतिक असून, हृदय दिन' साजरा केला जातो. हृदयविकाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जीवनशैलीतील बिघाड, मानसिक ताणतणाव, चुकीचा आहार व अयोग्य व्यायाम ही यामागची प्रमुख कारणे आहेत.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी आयुर्वेदाने दिलेली जीवनशैली आजही तितकीच प्रभावी ठरते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मागील काही वर्षांमध्ये हृदय रोगाने ग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. यामुळे अनेकांना अकाली मृत्यूला सामोरे जावे लागत आहे.
वृद्धांसमोर असलेली ही समस्या आता बालकांमध्येही पुढे येऊ लागल्याने चिंता व्यक्त होत आहे.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी उपाय
योग्य आहार व पचन : जेवण सकाळी ११:३० पूर्वी व रात्री ८:३० पूर्वी करावे. एक घास किमान ३२ वेळा चावून खाल्ल्यास पचन सुलभ होते व छातीवरील दाब कमी होतो.
आहारातील संतुलन : अति मसालेदार, उष्ण पदार्थ टाळावेत. आहारात दूध, तूप, डाळिंब, व फळभाज्या वाढवाव्यात.
फळभाज्यांचे महत्त्व : पालेभाज्यांच्या तुलनेत फळभाज्यांमध्ये पोषक घटक जास्त प्रमाणात असल्याने त्यांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.
मानसिक स्वास्थ्य : हृदयरोग वाढण्याचे मुख्य कारण मानसिक दडपण होय. चिंता, न्यूनगंड, चिडचिड यामुळे मन अस्थिर होते व हृदयावर ताण येतो.
हृदय संवर्धनासाठी आयुर्वेदाची सांगड आवश्यक
आयुर्वेद म्हणजे फक्त आजारी व्यक्तीला बरे करणारे शास्त्र नाही तर प्रत्येकाने निरोगी कसे राहावे, हे शिकवणारे एकमेव शास्त्र आहे. व्यायाम नेहमी 'अर्धशक्ती' करावा, असे आयुर्वेद सांगतो. चुकीच्या पद्धतीने, शक्तीच्या बाहेर किंवा चुकीच्या वेळी व्यायाम केल्यास हृदयावर अनावश्यक ताण येतो व हृदयरोग सारख्या समस्या उद्भवतात, असे डॉ. भोपळे यांनी सांगितले.
योग्यवेळी जेवण, शक्तीनुसार व्यायाम, संतुलित आहार, नियमित योग व ध्यान ही जीवनशैली अंगीकारल्यास हृदयरोगासारख्या दुर्दैवी आजारापासून बचाव होऊ शकतो. - डॉ. प्रवीण भोपळे, आयुर्वेदाचार्य, पंचकर्म-विशारद, बुलढाणा.