Lokmat Agro >शेतशिवार > विस्माने 'हा' कारखाना ठरवला राज्यातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना; आज पुरस्कार वितरण

विस्माने 'हा' कारखाना ठरवला राज्यातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना; आज पुरस्कार वितरण

Wisma has declared this factory as the best sugar factory in the state; Award distribution today | विस्माने 'हा' कारखाना ठरवला राज्यातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना; आज पुरस्कार वितरण

विस्माने 'हा' कारखाना ठरवला राज्यातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना; आज पुरस्कार वितरण

वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनकडून (विस्मा) यावर्षीच्या गाळप हंगामातील ऊस निगडीत विविध पुरस्कार राज्यातील कारखान्यांना जाहीर केले आहेत.

वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनकडून (विस्मा) यावर्षीच्या गाळप हंगामातील ऊस निगडीत विविध पुरस्कार राज्यातील कारखान्यांना जाहीर केले आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे : वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनकडून (विस्मा) यावर्षीच्या गाळप हंगामातील ऊस निगडीत विविध पुरस्कार राज्यातील कारखान्यांना जाहीर केले आहेत.

हा पुरस्कार वितरण सोहळा आज (ता. २१) म्हात्रे पुलाजवळील सिद्धीराज गार्डन येथे सकाळी साडेनऊ वाजता होणार असल्याची माहिती 'विस्मा'चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी दिली.

राज्यातील खासगी साखर कारखान्यांची शिखर संस्था म्हणून विस्मा काम करते. खासगी साखर उद्योगातील विशेष व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल निवडक सभासदांना 'विस्मा' सन्मानित करणार आहे.

या कार्यक्रमासाठी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील असणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान खालील विषयावर सादरीकरण होणार आहे.

भारतीय साखर उद्योगातील परिवर्तन आणि भविष्याचा मार्ग, साखर आणि संबंधित उत्पादनांच्या निर्मिती आणि प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर, हरित हायड्रोजन उत्पादन साखर उद्योगासाठी समृद्धीचे क्षितिज इ. विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.

'विस्मा' गाळप हंगाम २०२४-२५ पुरस्कार
सर्वोत्कृष्ट ऊस विकास - श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना लि. (पुणे)
सर्वोत्कृष्ट तांत्रिक व नवीनतम कार्य - जयवंत शुगर्स लि. (सातारा)
सर्वोत्कृष्ट जैवऊर्जा व जैवइंधनामध्ये कार्य - श्री गुरुदत्त शुगर्स लि. (कोल्हापूर)
सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन - द्वारकाधीश साखर कारखाना लि. (नाशिक)
सर्वोत्कृष्ट सामाजिक दायित्व - दालमिया भारत शुगर अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज लि. (कोल्हापूर)
सर्वोत्कृष्ट साखर कारखाना - नॅचरल शुगर अ‍ॅण्ड अलाइड इंडस्ट्रीज लि. (धाराशिव)

अधिक वाचा: पुढील ३ महिन्यांच्या आत प्रत्येक ग्रामपंचायतीत होणार हवामान केंद्र; काय आहे निर्णय? वाचा सविस्तर

Web Title: Wisma has declared this factory as the best sugar factory in the state; Award distribution today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.