Lokmat Agro >शेतशिवार > ट्रॅक्टर का बैलजोडी, काय संभाळणं परवडतय? काय म्हणतायत शेतकरी? जाणून घ्या सविस्तर

ट्रॅक्टर का बैलजोडी, काय संभाळणं परवडतय? काय म्हणतायत शेतकरी? जाणून घ्या सविस्तर

Why a tractor and a pair of bullock, what can you afford to maintain? What do farmers say? Find out in detail | ट्रॅक्टर का बैलजोडी, काय संभाळणं परवडतय? काय म्हणतायत शेतकरी? जाणून घ्या सविस्तर

ट्रॅक्टर का बैलजोडी, काय संभाळणं परवडतय? काय म्हणतायत शेतकरी? जाणून घ्या सविस्तर

चाराटंचाईमुळे गुरांच्या बाजारात दर आठवड्याला विक्रीसाठी आलेल्या जनावरांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे.

चाराटंचाईमुळे गुरांच्या बाजारात दर आठवड्याला विक्रीसाठी आलेल्या जनावरांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

चाराटंचाईमुळे गुरांच्या बाजारात दर आठवड्याला विक्रीसाठी आलेल्या जनावरांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे, बैलजोडीची किंमतही लाखात गेल्यामुळे बैलजोडी सांभाळणे सामान्य शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेर गेले आहे.

बैलांच्या किमती लाखोंच्या घरात
-
दिवसेंदिवस शेती करणे आता कठीण होत आहे.
- खते, बियाणे, औषधी यांचा खर्च गगनाला भिडला असतानाच शेतीवर नफा मिळणे कठीण झाले आहे.
- यातच सालगड्याचे भाव एका वर्षासाठी दीड लाखाच्या घरात पोहोचले आहेत.
- एवढे पैसे देऊनही जनावरांचे संगोपन करायला मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.
- यातच आता गेल्या काही वर्षात बैलांच्या किमती भडकल्या आहेत.
- सर्वसाधारण बैलजोडी दीड ते दोन लाख रुपये किमतीच्या घरात पोहोचली आहे.

बहुतांश शेतकरी अल्पभूधारक
-
वाढत्या लोकसंख्येमुळे शेतीची विभागणी झाल्याने बहुतांश शेतकरी अल्पभूधारक झाला आहेत.
- याशिवाय तालुक्यात चाराटंचाई असल्याने चाऱ्याच्या दराने डिझेलची बरोबरी गाठली आहे.
- बैलजोडी सांभाळणे कठीण झाले आहे.
- शेतीपेक्षा बैलाचा वापर तालुक्यात शर्यतीसाठी मोठ्या प्रमाणात केला जात आहे.
- लाखो रुपये मोजून एक बैल घाटमाथ्यावरून खरेदी केला जात आहे.

बैलगाडा मालक वाढले
शर्यतींच्या आवडीमुळे बैलगाडामालकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या बैलांच्या चाऱ्यावर मोठा खर्च केला जात आहे.

जुना ट्रॅक्टर परवडला
-
बैलांच्या किमती भडकल्याने व संगोपन परवडत नसल्याने शेतकऱ्यांचा ओढा ट्रॅक्टर खरेदीकडे वाढला आहे.
- यातच शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व यंत्र खरेदीसाठी शासनाच्या वतीने अनुदान दिले जात आहे.

दुभत्या जनावरांची मागणी
-
तसे पाहता दुभत्या जनावरांचे संगोपन करणे फार अवघड आहे.
- चाऱ्याच्या दरात आणि दुधाच्या दरात कमालीची तफावत आहे.
- पण शेणखत व दूध मिळत असल्याने दुभत्या जनावरांची मागणी वाढू लागली आहे.

अधिक वाचा: शेतकरी म्हणतोय निम्मे उत्पन्न देतो; पण माझी शेती कोणी वाट्याने करता का?

Web Title: Why a tractor and a pair of bullock, what can you afford to maintain? What do farmers say? Find out in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.