राजाराम लोंढेकोल्हापूर : युद्धामुळे एलपीजी गॅस टंचाईने शहरातील नागरिक हैराण असले, तरी ग्रामीण भागात घरोघरी सुरू असलेले बायोगॅसमुळे मुबलक गॅस मिळत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख २४ हजार युनिट कार्यान्वित झाली आहेत. त्यातून मिळणारा गॅस हा एलपीजी गॅसला सर्वोत्तम पर्याय ठरत आहे. ज्यांचे हे युनिट बंद होते, ती दुरुस्तीसाठी धांदल उडाल्याचे दिसते.
केंद्र व राज्य शासनाने बायोगॅसच्या माध्यमातून धूरमुक्त गावे करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये देशात नंबर वनवर कोल्हापूर जिल्हा राहिला आहे.
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने अतिशय प्रभावीपणे बायोगॅस योजना राबविल्याने देशात सर्वाधिक बायोगॅसची बांधणी कोल्हापुरात झाली आहे, यासाठी शासनाने ३४२ कोटी ३० लाख रुपये अनुदानाच्या रूपाने ग्रामीण कुटुंबांना वितरीत करण्यात आले आहे.
सध्या युद्धामुळे एलपीजी गॅसची टंचाई भासू लागल्याने शहरी भागातील नागरिक ग्रामीण भागात गॅस टंचाईच्या काहीसे हवालदिल झाले आहेत.
मात्र, कालावधीत बायोगॅस आधार ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. पूर्वी बांधलेली पण नादुरुस्त असलेली बायोगॅस सुरू करण्यासाठी ग्रामीण भागात काहीशी धांदल उडाल्याचे दिसते.
गोकुळ'कडून ९ हजार युनिट'गोकुळ'च्या माध्यमातून सिस्टीमा बायोगॅसच्या सहकार्याने शेतकऱ्यांना 'समृद्धी कार्बन क्रेडिट बायोगॅस'ची ९ हजार युनिट दिली आहेत. यातून गॅसची निर्मिती होत आहे.
गरज असेल, तरच गॅसग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या घरात अजूनही चूल आहेच. चुलीला पर्याय म्हणून बायोगॅस असतो. बायोगॅस नसेल तर 'एलपीजी' गॅस, असे असले तरी अचानक स्वयंपाक करायचा असेल किंवा घरी पाहुणे आले, तरच हा गॅस पेटतो.
अकरा गावांमध्ये १०० टक्के बायोगॅसमहालवाडी (भुदरगड), मोरेवाडी (चंदगड), हेळेवाडी (गडहिंग्लज), फराकटेवाडी (कागल), कुंभारवाडी व महाडिकवाडी (पन्हाळा), कातळेवाडी (शाहूवाडी), मोरेवाडी (आजरा), चौधरवाडी (गगनबावडा), निलेवाडी (हातकणंगले), शेळकेवाडी (करवीर), बरगेवाडी (राधानगरी)
अधिक वाचा: तुम्ही जारचे थंड पाणी पिताय? सावधान! वाचा जारच्या पाण्याबद्दल 'या' महत्वाच्या गोष्टी
Web Summary : Amidst LPG shortages, Kolhapur farmers rely on biogas. 1.24 lakh biogas units thrive, supported by government subsidies. 'Gokul' provides 9,000 units. Biogas serves as a primary cooking fuel or LPG alternative, especially in villages with 100% biogas adoption.
Web Summary : एलपीजी की कमी के बीच, कोल्हापुर के किसान बायोगैस पर निर्भर हैं। सरकारी सब्सिडी द्वारा समर्थित 1.24 लाख बायोगैस इकाइयां फलफूल रही हैं। 'गोकुल' 9,000 इकाइयां प्रदान करता है। बायोगैस प्राथमिक ईंधन है, खासकर 100% बायोगैस अपनाने वाले गांवों में।