Lokmat Agro >शेतशिवार > Wheat Production : यंदा जगभरात गहू बंपर पिकणार; उत्पादनात किती वाढ होणार?

Wheat Production : यंदा जगभरात गहू बंपर पिकणार; उत्पादनात किती वाढ होणार?

Wheat Production : This year, wheat will be harvested in bumper quantities worldwide; How much will the production increase? | Wheat Production : यंदा जगभरात गहू बंपर पिकणार; उत्पादनात किती वाढ होणार?

Wheat Production : यंदा जगभरात गहू बंपर पिकणार; उत्पादनात किती वाढ होणार?

यंदा जगभरातील गव्हाचे उत्पादन वाढून ७९.६ कोटी टनांवर जाण्याची शक्यता आहे. २०२४ च्या तुलनेत ते सुमारे १ टक्का जास्त आहे.

यंदा जगभरातील गव्हाचे उत्पादन वाढून ७९.६ कोटी टनांवर जाण्याची शक्यता आहे. २०२४ च्या तुलनेत ते सुमारे १ टक्का जास्त आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नवी दिल्ली : यंदा जगभरातील गव्हाचे उत्पादन वाढून ७९.६ कोटी टनांवर जाण्याची शक्यता आहे. २०२४ च्या तुलनेत ते सुमारे १ टक्का जास्त आहे.

युरोपीय संघात, विशेषतः फ्रान्स आणि जर्मनीमध्ये गव्हाचा पेरा वाढल्यामुळे उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. अमेरिकेतही गव्हाचा पेरा वाढला आहे.

तथापि, हिवाळ्यातील दुष्काळामुळे तेथील उत्पादनात किंचित घट होऊ शकते. संयुक्त राष्ट्रांच्या खाद्य व कृषी संघटनेच्या (एफएओ) अहवालानुसार, २०२४-२५ मध्ये जागतिक धान उत्पादन ५४.३ कोटी टन इतके होण्याची शक्यता आहे.

भारत, कंबोडिया आणि म्यानमार येथील अनुकूल हवामानामुळे धान उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे.

जागतिक धान्य उत्पादन अंदाज २८४.२ कोटी टन केला आहे. २०२४-२५ मध्ये धान्याची मागणी १ टक्क्याच्या वाढीसह २८६.७ कोटी टनांवर जाण्याची शक्यता आहे.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे वर्ष २०२४-२५ साठीचा प्रमुख कृषी पिकांच्या (खरीप आणि रबी) उत्पादनाचा दुसरा आगाऊ अंदाज जारी केला आहे.

यावर्षी खरीप हंगामात १६६३.९१ लाख मेट्रिक टन अन्नधान्याचे उत्पादन होईल तर रबी हंगामात १६४५.२७ लाख मेट्रिक टन अन्नधान्याचे उत्पादन होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

अधिक वाचा: देवगड हापूस आंब्यासाठी आता युनिक कोड; आंबा बागायतदारांना कसा होणार फायदा?

Web Title: Wheat Production : This year, wheat will be harvested in bumper quantities worldwide; How much will the production increase?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.