Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा फटका; मराठवाड्यातील 'इतके' हेक्टर पिकांचे नुकसान वाचा सविस्तर

Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा फटका; मराठवाड्यातील 'इतके' हेक्टर पिकांचे नुकसान वाचा सविस्तर

Unseasonal Rain: Unseasonal rains hit; 'So many' hectares of crops damaged in Marathwada Read in detail | Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा फटका; मराठवाड्यातील 'इतके' हेक्टर पिकांचे नुकसान वाचा सविस्तर

Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा फटका; मराठवाड्यातील 'इतके' हेक्टर पिकांचे नुकसान वाचा सविस्तर

Unseasonal Rain : मराठवाड्यात तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) दाणादाण उडवून दिली आहे. मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना अधिक, तर इतर जिल्ह्यांना कमी प्रमाणात पावसाने दणका दिला. वाचा सविस्तर

Unseasonal Rain : मराठवाड्यात तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) दाणादाण उडवून दिली आहे. मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना अधिक, तर इतर जिल्ह्यांना कमी प्रमाणात पावसाने दणका दिला. वाचा सविस्तर

छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) दाणादाण उडवून दिली आहे. मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना अधिक, तर इतर जिल्ह्यांना कमी प्रमाणात पावसाने दणका दिला.

वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसाने ५३ गावांतील १ हजार ५९४ शेतकऱ्यांच्या ८७१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान (crops damaged) केले आहे.

विभागाने प्रशासनाने नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश सर्व जिल्ह्यांना दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १४, परभणीतील १, बीडमधील १, लातूर ३७ अशा ५३ गावांमध्ये अवकाळीने थैमान घातले. बीडमध्ये १ जणाचा वीज पडून मृत्यू झाला. (Unseasonal Rain)

लहान-मोठी मिळून १५ जनावरे दगावली. छत्रपती संभाजीनगर मधील ६८८ हेक्टर, परभणीतील ३.२, बीडमधील ०.९० हेक्टर, तर लातूरमधील १७८, असे ८७१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिरायत २२७.६ हेक्टर, तर बागायत ५६६.६ व ७७.५ हेक्टरवरील फळपिकांना अवकाळीमुळे फटका बसला.

जिल्हागावेनुकसान
छ. संभाजीनगर१४६८८ हेक्टर
परभणी०१३.२ हेक्टर
बीड०१०.९० हेक्टर
लातूर३७१७८ हेक्टर
एकूण५३८७१ हेक्टर

हे ही वाचा सविस्तर : Unseasonal Rain: मराठवाड्यास पावसाचा फटका; हाती आलेल्या पिकांची माती वाचा सविस्तर

Web Title: Unseasonal Rain: Unseasonal rains hit; 'So many' hectares of crops damaged in Marathwada Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.