Join us
Daily Top 2Weekly Top 5

यंदा ऊस तोडीसाठी महिला मजुरांची संख्या पुरुषांबरोबरच; किती महिलांच्या हातात कोयता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 10:56 IST

यंदाच्या गळीत हंगामात मराठवाड्यातील बीड, परळी, परभणी, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आदी जिल्ह्यांतून एकूण १८३० ऊस तोडणीच्या टोळ्या आल्या आहेत.

भीमगोंडा देसाईकोल्हापूर : जिल्ह्यातील २३ साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात १४ हजार ३४ मजूर ऊस तोडणी, भरणीचे काम करीत आहेत. यामध्ये ५ हजार ९४९ महिला मजूरही पदर खोचून ऊन, थंडी, वाऱ्यात कष्टाचे काम करीत आहेत.

८२ गर्भवती महिलाही भाकरीसाठी ऊस तोडणीचे काम करीत आहेत. आरोग्य विभागाने या मजुरांच्या आरोग्याची तपासणी करण्याचे नियोजन केले आहे.

जिल्ह्यात २३ साखर कारखाने आहेत. यंदाच्या गळीत हंगामात मराठवाड्यातील बीड, परळी, परभणी, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आदी जिल्ह्यांतून एकूण १८३० ऊस तोडणीच्या टोळ्या आल्या आहेत.

टोळ्यातील मजूर पत्नी, मुलांसह पालाची झोपडी मारून संसार थाटला आहे. अनेक मजूर कारखाना कार्यस्थळावर आणि उसाच्या फडातच राहिले आहेत. दिवसभर ऊस तोडणी, भरणीचे काम ते करतात. त्यांच्यासोबत त्यांची कच्चीबच्ची आहेत.

महिला, मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे, म्हणून शासनाचे आरोग्य विभाग कारखानानिहाय आरोग्य शिबिर आयोजित करून त्याची आरोग्य तपासणी करीत आहे.

पहिल्या टप्प्यातील आरोग्य तपासणीत १८५९ मजुरांना ताप असल्याचे समोर आले. यामध्ये १५८१ पुरुष आणि ८३१ महिलांचा समावेश आहे. अंगात ताप असतानाही ते ऊस तोडणी, भरणीचे काम करीत आहेत.

१४ हजार मजूर खेडोपाडी, दुर्गम परिसरात उसाच्या फडाशेजारी झोपडी मारून राहत आहेत. त्यांच्यापर्यंत आरोग्य सेवा, सुविधा पोहोचवणे आरोग्य यंत्रणेला अडचणीचे होत आहे.

महिला मजुरांचे कष्ट..◼️ महिला मजूर ऊस तोडणी, भरणीसह स्वयंपाक करतात. त्या अविश्रांत काम करीत असल्याने त्याची प्रकृती खालावत आहेत.◼️ मासिक पाळीच्या दरम्यानही त्यांना ऊस भरणीचे काम करावे लागत आहे.◼️ गरिबीमुळे त्या पतीला साथ देत आहेत. ८२ गर्भवती विश्रांतीच्या काळातही कष्टाचे काम करीत आहेत.◼️ आनंदाने बागडण्याच्या वयात मजुरांची मुले उसाच्या फडात दिसतात.◼️ पाच वर्षांवरील मुले शाळांना दांडी मारून आई, वडिलांना मदत करीत आहेत.

जिल्ह्यातील मजूर दृष्टीक्षेपात◼️ १८३० मजूर टोळ्या.◼️ ८०९५ पुरुष मजूर.◼️ ५९४९ महिला मजूर.◼️ ५५९ मुले (पाच वर्षांखालील)◼️ ४९८ मुली (पाच वर्षांखालील)

अधिक वाचा: ३० कोटींहून अधिक जमिनींच्या जुन्या व्यवहारांचे दस्त ऑनलाईन उपलब्ध होणार; काय आहे निर्णय?

English
हिंदी सारांश
Web Title : Equal Number of Women Laborers for Sugarcane Harvesting This Year

Web Summary : Kolhapur's sugarcane harvest sees 5,949 women laborers working alongside men. Many laborers migrate with families, facing health challenges. Health camps are being organized to address the needs of these vulnerable workers, including pregnant women and children, who often assist with the harvest instead of attending school.
टॅग्स :ऊससाखर कारखानेकाढणीमहिलाकामगारकोल्हापूरमराठवाडाहिवाळाआरोग्यबीडपरभणीधाराशिवशेतकरीशाळा