lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > यंदा आंब्याचा हंगाम पुढे गेला.. उत्पादनातही होणार वाढणार

यंदा आंब्याचा हंगाम पुढे गेला.. उत्पादनातही होणार वाढणार

This year the mango season has boom and the production will also increase | यंदा आंब्याचा हंगाम पुढे गेला.. उत्पादनातही होणार वाढणार

यंदा आंब्याचा हंगाम पुढे गेला.. उत्पादनातही होणार वाढणार

कोकणात जानेवारी ते मार्च महिन्यात अवकाळी पाऊस, चक्रीवादळाचा तडाखा न बसल्यामुळे यावर्षी आंब्याच्या झाडांना चांगला मोहर लागून मोठ्या प्रमाणात फळधारणा झाली. त्यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आंबा उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ होणार.

कोकणात जानेवारी ते मार्च महिन्यात अवकाळी पाऊस, चक्रीवादळाचा तडाखा न बसल्यामुळे यावर्षी आंब्याच्या झाडांना चांगला मोहर लागून मोठ्या प्रमाणात फळधारणा झाली. त्यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आंबा उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ होणार.

शेअर :

Join us
Join usNext

कोकणात जानेवारी ते मार्च महिन्यात अवकाळी पाऊस, चक्रीवादळाचा तडाखा न बसल्यामुळे यावर्षी आंब्याच्या झाडांना चांगला मोहर लागून मोठ्या प्रमाणात फळधारणा झाली. त्यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आंबा उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ होणार असल्याचे आंबा उत्पादकांचे मत आहे.

सहाशे पन्नास रुपये डझनने मिळणारा आंबा आवक झाल्यास कमी होईल, असा अंदाज आंबा उत्पादकांनी व्यक्त केला. कोकण पट्टयात हापूस, केसर आंबा त्याच्या वैशिष्ट्यामुळे प्रसिद्ध आहे. देशविदेशातून कोकणातील हापूस आंब्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते.

साधारण जानेवारी, फेब्रुवारी दरम्यान आंब्याच्या झाडांना मोहर लागून फळधारणा व्हायला सुरुवात होते. या काळात कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळे येतात. त्यामुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यातील फळ उत्पादकांना फटका बसतो.

मागच्या वर्षी कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. त्यामुळे आंबा उत्पादन घटले होते. पण, यावर्षी निसर्गाने साथ दिली आहे.

म्हणून आंब्याचा हंगाम पुढे गेला
यावर्षी राज्यात चांगली थंडी होती. त्यामुळे आंबा पिकासाठी अनुकूल वातावरण असल्यामुळे आंब्याच्या झाडांना चांगला मोहर लागून फळधारणा मोठ्या प्रमाणावर झाली आहे. पण, थंडीचा कालावधी वाढल्यामुळे तसेच सुरुवातीचा मोहर गळून पडल्यामुळे यावर्षी आंब्याचा हंगाम लांबला आहे.

चक्रीवादळ किंवा अवकाळी पाऊस न झाल्यामुळे आंब्याच्या झाडांना मागच्या वर्षीच्या तुलनेत चांगली फळे लागली आहे. त्यामुळे यावर्षी आंबा पिकाचे उत्पादन वाढले आहे. कोकणातील हापूस आंब्याचा आकार अजून लहान असल्यामुळे निर्यात सुरु केली नाही. पण, पुढील २० ते २५ दिवसांत आंबा विक्री योग्य होईल. सध्या दर तेजीत असले तरी पुढच्या काही दिवसात दर सर्वसामान्यांच्या आवक्यात येतील. - दिलीप देशमुख, उत्पादक

अधिक वाचा: आंबा कॅनिंगला सुरवात प्रतिकिलोमागे शेतकऱ्यांना मिळतोय एवढा दर

Web Title: This year the mango season has boom and the production will also increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.