Lokmat Agro >शेतशिवार > राज्यातील 'हे' गाव पीकविमा ऑनलाईन पोर्टलवर दिसेना; दोन हजार शेतकऱ्यांना फटका

राज्यातील 'हे' गाव पीकविमा ऑनलाईन पोर्टलवर दिसेना; दोन हजार शेतकऱ्यांना फटका

'This' village in the state does not appear on the crop insurance online portal; Two thousand farmers affected | राज्यातील 'हे' गाव पीकविमा ऑनलाईन पोर्टलवर दिसेना; दोन हजार शेतकऱ्यांना फटका

राज्यातील 'हे' गाव पीकविमा ऑनलाईन पोर्टलवर दिसेना; दोन हजार शेतकऱ्यांना फटका

जून महिन्यात शेतकऱ्यांनी पेरणी केली. खरीप २०२५ मध्ये पेरणी केलेल्या सोयाबीन तूर, मूग, उडीद, कांदा, मटकी अशा बहुतांश पिकांचा समावेश यात आहे.

जून महिन्यात शेतकऱ्यांनी पेरणी केली. खरीप २०२५ मध्ये पेरणी केलेल्या सोयाबीन तूर, मूग, उडीद, कांदा, मटकी अशा बहुतांश पिकांचा समावेश यात आहे.

शेअर :

Join us
Join usNext

बार्शी तालुक्यात कारी येथील २,३१८, तर २०१९ गट धारक शेतकरी पीक विमा भरण्यापासून वंचित राहिले आहेत. हे गाव पोर्टलवर ऑनलाइन दिसत नाही, यावर कृषी विभागही हतबल झाले आहे.

जून महिन्यात शेतकऱ्यांनी पेरणी केली. खरीप २०२५ मध्ये पेरणी केलेल्या सोयाबीन तूर, मूग, उडीद, कांदा, मटकी अशा बहुतांश पिकांचा समावेश यात आहे.

गतवर्षीपासून ढासळलेल्या बाजारभावामुळे उडीद, तूर व कांदा लागवड क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. पूर्ण गावचे क्षेत्रफळे ३,९६७.३१ हेक्टर असून, गेल्या ३० दिवसांपासून दमदार पाऊस झाला नाही. परिणामी खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटली आहे.

१ जुलैपासून पीक विमा भरणे सुरू झाले आहे, परंतु कारी गाव ऑनलाइन पोर्टल दिसत नाही. हे गाव सन २०१९ मध्ये धाराशिव जिल्ह्यात समावेश झाले होते, परंतु काही तांत्रिक कारणामुळे ते सन २०२४ पासून पुन्हा सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यात समाविष्ट झाले.

बदलाच्या या गोंधळात पाच महिन्यांपासून प्रशासकीय काम बार्शी तालुक्यातून सुरू झाले आहे. तरी देखील कृषी विभागाचा माहिती व तंत्रज्ञान गाव, कोड सोलापूर जिल्ह्यात दिसत नाही.

पीक विमा भरण्याचा कालावधी ३१ जुलै म्हणजे फक्त ८ दिवस राहिले असून, पूर्ण गाव पीक विमा भरण्यापासून वंचित राहण्याची चिन्हे आहेत.

गेल्या ३० दिवसांपासून दमदार पाऊसच नाही
◼️ खरीप २०२५ मध्ये पेरणी केलेल्या सोयाबीन तूर, मूग, उडीद, कांदा, मटकी अशा बहुतांश पिकांचा समावेश यात आहे.
◼️ गतवर्षीपासून ढासळलेल्या बाजार भावामुळे उडीद, तूर व कांदा लागवड क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे.
◼️ पूर्ण गावचे क्षेत्रफळे ३,९६७.३१ हेक्टर असून, गेल्या ३० दिवसांपासून दमदार पाऊस झाला नाही.
◼️ परिणामी खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटली आहे.

पीक विमा भरण्याचा कालावधी अंतिम टप्प्यात आला आहे. पूर्ण गाव विमा भरण्यापासून वंचित राहिल्यास अनेक शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान होईल. ऑफलाइन पद्धतीने सोलापूर डीसीसी बँकमध्ये भरण्याची सोय कृषी विभागाने करावी. - उमेश डोके, शेतकरी, कारी

वरिष्ठ स्तरावर लेखी स्वरूपात दोन वेळेस प्रस्ताव दाखल केला. कृषी आयुक्तांना देखील फोनवर सूचित केले आहे. आताही पाठपुरावा सुरू आहे. याबाबत लवकरच निर्णय होईल. - शुक्राचार्य भोसले, जिल्हा कृषी अधीक्षक, सोलापूर

असंख्य शेतकरी रोज पीक विमा भरण्यासाठी विचारणा करताहेत, परंतु गाव ऑनलाइन कोड दिसत नसल्याने पीक विमा भरता येत नाही. - अनिल विधाते, सीएससी केंद्रचालक

अधिक वाचा: Ranbhajya: पावसाळ्यात रानभाज्यांची जादू; चवीबरोबरच 'या' रानभाज्यांचा आरोग्यालाही मोठा फायदा

Web Title: 'This' village in the state does not appear on the crop insurance online portal; Two thousand farmers affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.