आरोग्यवर्धक बहुगुणी शेवळाची भाजी बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाली आहे. २० रुपये जुडी दराने तिची विक्री सुरू असून, नागरिकांकडून तिची जोरात खरेदी सुरू आहे.
पावसाळा सुरू झाला की रानभाज्यांचे वेध लागतात. दाट जंगलात आपोआप उगवणाऱ्या, सर्वत्र उपलब्ध न होणाऱ्या या भाज्या म्हणजे पर्वणीच असते.
एका मर्यादित कालवधीत उपलब्ध होणाऱ्या या रानभाज्या पोषक गुणांची खाण म्हणून ओखळल्या जातात. त्यातील शेवळाच्या भाजीला विषेश पसंती आहे.
शेवळाची भाजी पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. यात 'ड' जीवनसत्व असल्याने स्त्रियांच्या आरोग्यासाठी ही भाजी महत्त्वाची मानली जाते.
महाराष्ट्रीयन संस्कृतीच्या वैशिष्ट्यांपैकी एक असलेली ही शेवळाची भाजी डोंगराळ भागात दाट जंगलात येते. त्याची शेती करता येत नाही. ही भाजी एका देठासारखी दिसते.
महाराष्ट्रातल्या गावाकडच्या बाजारात ही भाजी मिळते. गुणांनी पौष्टिक असलेली ही ही रानभाजी केवळ सात ते दहा दिवसच उपलब्ध असते.
या रानभाजीमध्ये आतड्यातील हानिकारक जीवाणू नष्ट करण्याची क्षमता असते. ती रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. त्यामुळे शेवळाची भाजी खरेदीसाठी गर्दी होत आहे.
जंगली सुरण म्हणूनही आहे वेगळी ओळखशेवळाच्या भाजीला जंगली सुरण या नावानेही ओळखले जाते. तिच्या वैशिष्ट्यांमुळे मराठी लोकांच्या आहारात पावसाळ्यात या शेवळाच्या भाजीला मोठे महत्त्व आहे. शेवळाच्या भाजीला इंग्रजीमध्ये 'ड्रॅगन स्टॉक याम' असेदेखील म्हणतात.
अधिक वाचा: आता कृषीपूरक व्यवसायांसाठी या योजनेतून मिळणार ५० लाख ते १ कोटीपर्यंत कर्ज; वाचा सविस्तर