Lokmat Agro >शेतशिवार > राज्यातील 'ह्या' साखर कारखान्याचा सहवीज निर्मिती प्रकल्प ठरला देशात सर्वोत्कष्ट

राज्यातील 'ह्या' साखर कारखान्याचा सहवीज निर्मिती प्रकल्प ठरला देशात सर्वोत्कष्ट

This sugar factory's co-generation project in the state has become the best in the country. | राज्यातील 'ह्या' साखर कारखान्याचा सहवीज निर्मिती प्रकल्प ठरला देशात सर्वोत्कष्ट

राज्यातील 'ह्या' साखर कारखान्याचा सहवीज निर्मिती प्रकल्प ठरला देशात सर्वोत्कष्ट

कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल येथे झालेल्या शानदार समारंभात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि भारतीय शुगरचे विक्रमसिंह शिंदे यांच्या हस्ते कंपनीचे युनिट हेड संतोष कुंभार यांनी पुरस्कार स्वीकारला.

कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल येथे झालेल्या शानदार समारंभात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि भारतीय शुगरचे विक्रमसिंह शिंदे यांच्या हस्ते कंपनीचे युनिट हेड संतोष कुंभार यांनी पुरस्कार स्वीकारला.

शेअर :

Join us
Join usNext

राष्ट्रीय पातळीवर साखर कारखानदारीमध्ये गेल्या ५० वर्षांपासून काम करणाऱ्या भारतीय शुगरकडून आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त (दालमिया भारत शुगर) साखर कारखान्यास राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट सहवीज निर्मित प्रकल्प पुरस्कार देण्यात आला.

कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल येथे झालेल्या शानदार समारंभात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि भारतीय शुगरचे विक्रमसिंह शिंदे यांच्या हस्ते कंपनीचे युनिट हेड संतोष कुंभार यांनी पुरस्कार स्वीकारला.

दालमिया साखर कारखाना नेहमीच कारखान्यामध्ये आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. अतिशय बारकाव्याने विचार करून उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला जात.

त्याचेच फलित म्हणून हा पुरस्कार दत्त दालमिया साखर कारखान्याला मिळाला असल्याचे मत युनिट हेड संतोष कुंभार यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी चीफ इंजिनियर शिवप्रसाद पडवळ, असि. जनरल मॅनेजर केव शिवप्रसाद देसाई, कनगसबाई, चिंतामणी पाटील, संभाजी भोसले, मनीष अग्रवाल, सुंदर रेड्डी, महेश आरडे, आदींसह विविध विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते.

अधिक वाचा: Sugarcane FRP : हंगामाच्या शेवटीच साखर उतारा होणार निश्चित; केंद्र सरकारचे नवीन परिपत्रक

Web Title: This sugar factory's co-generation project in the state has become the best in the country.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.