सणसर : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यामध्ये कामगारांना १० टक्के वेतनवाढ देण्याला तत्त्वतः मान्यता देण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्यातील साखर कारखान्यांमधील कामगारांच्या मागण्यांबाबत महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या त्रिपक्षीय समितीच्या करारानुसार पगारवाढ व सोयी सुविधा देण्याचे मान्य करण्यात आल्या.
दिनांक २३ जुलै झालेल्या बैठकीत दिनांक १ एप्रिल २०२४ पासून सर्व अधिकारी व कामगार यांचे मूळ पगार, महागाई भत्ता व स्थिर भत्ता मिळून मिळणाऱ्या एकूण पगारावर १० टक्के पगारवाढ व सोयी सुविधा देण्याचे मान्य करण्यात आले आहे. त्यानुसार करार करण्यात आला.
कारखान्याच्या १२ ऑगस्ट रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत शासन निर्णयाचे अपेक्षेवर दिनांक २३ जुलै रोजी झालेल्या त्रिपक्षीय समितीच्या करारानुसार कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी यांना १० टक्के वेतनवाढ देण्यास कारखाना संचालक मंडळाने तत्त्वतः मान्यता दिली.
सभासद व कामगार ही एकाच रथाची दोन चाके
◼️ सभासदांबरोबरच कामगारांच्या हिताला प्राधान्य, त्रिपक्षीय समितीच्या करारानुसार कामगारांना सर्वप्रथम वेतनवाढ लागू करणारा श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना हा राज्यातील पहिला कारखाना असून हा कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे मार्गदर्शनाखाली वाटचाल करीत आहे.
◼️ सभासद व कामगार ही एकाच रथाची दोन चाके असून कामगारांच्या हिताला देखील सर्वोच्च प्राधान्य देण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न आहे. त्यासाठी कारखाना कुठेही मागे राहणार नाही, अशी ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी दिली.
अधिक वाचा: e Pik Pahani : आता पिक पाहणी होणार झटपट; वापरा अपडेटेड व्हर्जनचे 'हे' मोबाईल अॅप