Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > रोजगार हमी योजनेसाठी मनरेगाच्या जागी लागू होणार 'हा' नवीन कायदा; कसा होणार फायदा?

रोजगार हमी योजनेसाठी मनरेगाच्या जागी लागू होणार 'हा' नवीन कायदा; कसा होणार फायदा?

This new law will replace MNREGA for employment guarantee scheme; How will it benefit? | रोजगार हमी योजनेसाठी मनरेगाच्या जागी लागू होणार 'हा' नवीन कायदा; कसा होणार फायदा?

रोजगार हमी योजनेसाठी मनरेगाच्या जागी लागू होणार 'हा' नवीन कायदा; कसा होणार फायदा?

vbg ram राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी विकसित भारत-गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण) अर्थात व्हीबी-जी राम जी विधेयकाला रविवारी मंजुरी दिली.

vbg ram राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी विकसित भारत-गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण) अर्थात व्हीबी-जी राम जी विधेयकाला रविवारी मंजुरी दिली.

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी विकसित भारत-गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण) अर्थात व्हीबी-जी राम जी विधेयकाला रविवारी मंजुरी दिली.

कायद्यात ग्रामीण कुटुंबांसाठी आर्थिक वर्षात रोजगाराची वैधानिक हमी १२५ दिवसांपर्यंत वाढविण्यात आली आहे. हे विधेयक संसदेने सविस्तर चर्चेनंतर नुकतेच संमत केले होते. या विधेयकाची अधिसूचना रविवारी जारी झाली आहे.

व्हीबी-जी राम जी कायदा का महत्त्वाचा?
व्हीबी-जी राम जी कायद्यांतर्गत दिला जाणारा मजुरीवर आधारित रोजगार चार क्षेत्रांशी संबंधित आहे.
१) जलसुरक्षा आणि पाण्यासंबंधी कामे.
२) मुख्य ग्रामीण पायाभूत सुविधा.
३) उपजीविकेशी संबंधित पायाभूत सुविधा.
४) प्रतिकूल हवामान घटनांचा प्रभाव कमी करण्यासाठीची कामे.
या गोष्टींतून ग्रामीण भागाचाही विकास साधण्यात येणार आहे.

ही आहेत कायद्याची ठळक वैशिष्ट्ये
◼️ पेरणी व कापणीच्या ऐन हंगामात शेतीसाठी पुरेशा संख्येने मजूर उपलब्ध होण्यासाठी या कायद्यांतर्गत राज्यांना आर्थिक वर्षात एकत्रितपणे जास्तीत जास्त ६० दिवसांचा विश्रांती कालावधी निश्चित करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
◼️ उर्वरित कालावधीत १२५ दिवसांची संपूर्ण रोजगार हमी कायम राहते, ज्यामुळे कृषी उत्पादकता आणि मजुरांची सुरक्षितता यांच्यात संतुलित समन्वय राखला जातो.

नव्या कायद्यात उपजीविकेची सुरक्षितता
◼️ व्हीबी-जी राम जी हा कायदा मनरेगाच्या जागी लागू होणार आहे.
◼️ नव्या कायद्याअंतर्गत उपजीविकेची सुरक्षितता वाढविण्यात आली असून, तो 'विकसित भारत २०४७'च्या संकल्पाला अनुसरून आखला गेला आहे.
◼️ सक्षमीकरण, वृद्धी, एकात्मिकीकरण आणि परिपूर्णता या तत्त्वांवर आधारित या कायद्याच्या माध्यमातून ग्रामीण कुटुंबांसाठीच्या उत्पन्न सुरक्षेला बळकटी मिळणार आहे. या विधेयकाला काँग्रेसने प्रखर विरोध केला आहे.

अधिक वाचा: राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कर्जाची मर्यादा वाढवली; आता हेक्टरी किती मिळणार कर्ज?

Web Title : मनरेगा की जगह नया कानून: वीबी-जी राम जी के फायदे

Web Summary : राष्ट्रपति मुर्मू ने वीबी-जी राम जी को मंजूरी दी, जो ग्रामीण रोजगार के 125 दिनों की गारंटी देता है। यह जल सुरक्षा, ग्रामीण बुनियादी ढांचे और जलवायु अनुकूलन पर केंद्रित है। राज्य चरम मौसम के दौरान 60 दिनों का ब्रेक ले सकते हैं। कानून का उद्देश्य 'विकसित भारत 2047' के अनुरूप ग्रामीण आय सुरक्षा को मजबूत करना है।

Web Title : New Law to Replace MGNREGA: Benefits of VB-G Ram Ji

Web Summary : President Murmu approved VB-G Ram Ji, guaranteeing 125 days of rural employment. It focuses on water security, rural infrastructure, and climate resilience. States can have 60-day breaks during peak seasons. The law aims to strengthen rural income security, aligning with 'Developed India 2047'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.