Lokmat Agro >शेतशिवार > मधुमेहावर नियंत्रण आणि हृदय सुदृढ ठेवण्यासाठी बाजारात आलंय 'हे' विदेशी फळ

मधुमेहावर नियंत्रण आणि हृदय सुदृढ ठेवण्यासाठी बाजारात आलंय 'हे' विदेशी फळ

This exotic fruit has been launched in the market to control diabetes and keep the heart healthy | मधुमेहावर नियंत्रण आणि हृदय सुदृढ ठेवण्यासाठी बाजारात आलंय 'हे' विदेशी फळ

मधुमेहावर नियंत्रण आणि हृदय सुदृढ ठेवण्यासाठी बाजारात आलंय 'हे' विदेशी फळ

आहारात फळांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यातीलच एक पौष्टिक आणि लोकप्रिय म्हणून हे फळ सध्या बाजारात चर्चेत आहे.

आहारात फळांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यातीलच एक पौष्टिक आणि लोकप्रिय म्हणून हे फळ सध्या बाजारात चर्चेत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

आहारात फळांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यातीलच एक पौष्टिक आणि लोकप्रिय फळ म्हणजे आलू बुखारा. चवदार आणि आरोग्यासाठी लाभदायक असलेले हे फळ सध्या बाजारात चर्चेत आहे.

आलू बुखारा हे फळ जीवनसत्त्व, फायबर, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे. याचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते, हृदय आणि डोळ्यांचे आरोग्य राखले जाते. तसेच वजन व मधुमेह नियंत्रणात राहतो.

यामध्ये असलेले पॉलीफेनॉल्स अँटिऑक्सिडंट्स कर्करोगाचा धोका कमी करण्यासही मदत करतात. देशात हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर, पंजाब आणि नागालँड या थंड हवामान असलेल्या राज्यांमध्ये याची लागवड केली जाते.

Plum Fruit आलू बुखारा बाजारात येते कोठून?
◼️ आलू बुखारा हे जगातील अनेक देशांमध्ये पिकवले जाते.
◼️ चीन हा जगातील सर्वात मोठा आलू बुखारा उत्पादक देश आहे, जो जागतिक उत्पादनाचा अर्ध्याहून अधिक वाटा उचलतो.
◼️ याशिवाय, सर्बिया, रोमानिया, अमेरिका आणि तुर्की हे देखील प्रमुख उत्पादक देश आहेत.
◼️ भारतात, थंड हवामान असलेल्या राज्यांमध्ये याची लागवड केली जाते.
◼️ उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पंजाब आणि नागालँड ही भारतातील प्रमुख आलू बुखारा उत्पादक राज्ये आहेत.
◼️ त्यामुळे बाजारात दिसणारे आलू बुखारा आपल्या देशातून तसेच चीन किंवा इतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून आयात केलेले असू शकते.
◼️ तथापि, इतर फळांप्रमाणेच आलू बुखाराचे अधिक सेवन केल्यास दुष्परिणाम संभवतात. उदा. पचन बिघडणे, साखर वाढणे, मूत्रपिंडातील खडे निर्माण होणे. त्यामुळे याचे प्रमाणित सेवन करणे आवश्यक आहे.

बाजारात भाव कसा?
सध्याच्या काळात, बाजारात आलू बुखाराचा भाव अंदाजे १५० ते २५० रुपये प्रति किलो आहे. हा भाव फळाच्या गुणवत्तेनुसार, आकारानुसार आणि उपलब्धतेनुसार बदलू शकतो. येणाऱ्या सणांमुळे मागणी वाढल्यास दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

आलू बुखारा हे फळ अनेक जीवनसत्त्वयुक्त व अँटिऑक्सिडंटने परिपूर्ण आहे. तुमचा रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत करते. त्याच्या सेवनाने अनेक लाभ होतात. आलू बुखाराचे अधिक सेवन केल्यास दुष्परिणाम संभवतात. आहारतज्ञ व वैद्यकीय सल्ला घेऊन फळाचे सेवन करावे.

अधिक वाचा: आईच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यातच नोकरदार भावाने सर्व जमीन केली शेतकरी भावाच्या नावावर

Web Title: This exotic fruit has been launched in the market to control diabetes and keep the heart healthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.