Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > राईस नव्हे आता कॉर्न सिटी म्हणून 'या' जिल्ह्याची ओळख निर्माण होणार; शासनाकडे ३५ कोटींचा आराखडा सादर

राईस नव्हे आता कॉर्न सिटी म्हणून 'या' जिल्ह्याची ओळख निर्माण होणार; शासनाकडे ३५ कोटींचा आराखडा सादर

This district of the state will now be known as Corn City, not Rice City; A plan worth Rs 35 crores will be submitted to the government | राईस नव्हे आता कॉर्न सिटी म्हणून 'या' जिल्ह्याची ओळख निर्माण होणार; शासनाकडे ३५ कोटींचा आराखडा सादर

राईस नव्हे आता कॉर्न सिटी म्हणून 'या' जिल्ह्याची ओळख निर्माण होणार; शासनाकडे ३५ कोटींचा आराखडा सादर

एकाच प्रकारचे पीक घेतल्याने जमिनीची गुणवत्ता खालावत चालली असून धानाची शेती म्हणजे तोट्याचा सौदा झाली आहे. त्यामुळेच 'या' जिल्ह्याची ओळख आता कॉर्न सिटी म्हणून निर्माण करून देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

एकाच प्रकारचे पीक घेतल्याने जमिनीची गुणवत्ता खालावत चालली असून धानाची शेती म्हणजे तोट्याचा सौदा झाली आहे. त्यामुळेच 'या' जिल्ह्याची ओळख आता कॉर्न सिटी म्हणून निर्माण करून देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे उत्पादन घेतले जाते. येथील तांदळाची गुणवत्ता चांगली असल्याने देशविदेशात तांदूळ निर्यात केला जातो. त्यामुळेच गोंदिया जिल्ह्याची ओळख ही राईस सिटी म्हणून आहे. पण एकाच प्रकारचे पीक घेतल्याने जमिनीची गुणवत्ता खालावत चालली असून धानाची शेती म्हणजे तोट्याचा सौदा झाली आहे.

याला पर्याय पीक म्हणून मका लागवडीकडे शेतकऱ्यांना वळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. कृषी विभागाने राईस सिटीची ओळख पुसून कॉर्न सिटी ही नवीन ओळख निर्माण करून देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कृषी विभागाने जिल्ह्यात व्यावसायिक पिकांना चालना देत ३५ कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आराखडा राज्य शासनाकडे सादर केला आहे.

या प्रकल्पाच्या माध्यमातून मका लागवड क्षेत्राचा विस्तार करण्याचे प्रस्तावित आहे. पाणीटंचाईचा धोका कमी करत शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात सुमारे २ लाख १५ हजार हेक्टर, तर उन्हाळ्यात ७० हजार हेक्टर क्षेत्रावर धानपीक घेतले जाते.

त्यामुळे तिसऱ्या पिकाचा पर्याय मर्यादित राहतो. त्यातच अपेक्षित दर न मिळाल्याने खर्च वजा जाता नफ्याचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस नाजूक होत चालली आहे.

शेतकऱ्यांना मिळणार धानाला पर्याय

जिल्ह्यातील शेतकरी केवळ धानाचे उत्पादन घेतात. पण धानाच्या लागवड खर्चात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे धानाची शेती म्हणजे शेतकऱ्यांसाठी तोट्याचा सौदा होत आहे. त्याला पर्याय म्हणून मका पिकाची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांना वळविले जात आहे.

ड्रायझोन क्षेत्रात वाढ धोकादायक

• उन्हाळी धानासाठी मोठ्या प्रमाणावर भूगर्भातून पाण्याचा उपसा करावा लागतो. पण जिल्ह्यातील जमिनीची संरचना लक्षात घेता पाणी मुरण्याचे प्रमाण कमी आहे.

• परिणामी, भविष्यात सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता धोक्यात येण्याची तसेच काही भाग ड्राय झोन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

• या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने उन्हाळी धानाचे क्षेत्र कमी करून कमी पाण्यात येणाऱ्या मक्याकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन तालुक्यात ९० टक्के लागवड क्षेत्र

• अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी हे दोन तालुके मका लागवडीत आघाडीवर असून एकूण लागवडीपैकी २० टक्के क्षेत्र या दोन तालुक्यांत आहे.

• विशेष म्हणजे, येथे हमीभावाने मका खरेदी केली जाते; त्यासाठी दोन खरेदी केंद्रे कार्यरत असून विपणन व्यवस्था भक्कम असल्याचे चित्र आहे.

सध्या ७५०० हेक्टरवर मका लागवड

• सुरवातीला ११० कोटी रुपयांचा प्रकल्प आराखडा सादर करण्यात आला होता. मात्र, केंद्रस्तरावर इतक्या मोठ्या निधीची उपलब्धता मर्यादित असल्याने हा आराखडा ३५ कोटी रुपयांपर्यंत संकुचित करण्यात आला आहे.

• जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश कानवडे यांच्या माहितीनुसार जिल्ह्यात सुरवातीला केवळ ५०० एकर क्षेत्रावर मका लागवड होती. त्यानंतर ती २,००० आणि ४५०० यंदा ७५०० एकरांपर्यंत वाढली आहे.

जिल्ह्यात उन्हाळी व रब्बी हंगामातही मोठ्या क्षेत्रावर धानपीक घेतले जाते. उन्हाळी धानाला पाण्याची गरज अधिक असते; त्याउलट केवळ ३० टक्के पाण्यात मका उत्पादन मिळते. मका पिकाला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. - नीलेश कानवडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गोंदिया.

हेही वाचा : एक एकर दोडका ठरला पारंपरिक शेतीच्या तुलनेत लाख फायद्याचा; वाचा प्रकाशरावांची यशकथा

Web Title : गोंदिया जिला 35 करोड़ की योजना से मक्का शहर बनने का लक्ष्य बना रहा है।

Web Summary : गोंदिया, जो राइस सिटी के नाम से जाना जाता है, मिट्टी की गुणवत्ता और लाभप्रदता में गिरावट के कारण मक्का की खेती में बदलाव करना चाहता है। 35 करोड़ की परियोजना का उद्देश्य मक्का की खेती का विस्तार करना, किसानों को पानी की कमी की चिंताओं के बीच एक स्थायी आय विकल्प प्रदान करना है। पानी की गहन चावल पर निर्भरता को कम करने पर ध्यान केंद्रित किया गया है।

Web Title : Gondia District aims to become Corn City with 35 crore plan.

Web Summary : Gondia, known as Rice City, seeks a shift to corn cultivation due to declining soil quality and profitability. A 35-crore project aims to expand corn farming, offering farmers a sustainable income alternative amidst water scarcity concerns. The focus is on reducing reliance on water-intensive rice.