Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > सोलापूर जिल्ह्यातील 'या' २२ साखर कारखान्यांनी केले तेवीस लाख मेट्रिक टन उसाचे गाळप

सोलापूर जिल्ह्यातील 'या' २२ साखर कारखान्यांनी केले तेवीस लाख मेट्रिक टन उसाचे गाळप

These 22 sugar factories in Solapur district crushed 2.3 million metric tons of sugarcane | सोलापूर जिल्ह्यातील 'या' २२ साखर कारखान्यांनी केले तेवीस लाख मेट्रिक टन उसाचे गाळप

सोलापूर जिल्ह्यातील 'या' २२ साखर कारखान्यांनी केले तेवीस लाख मेट्रिक टन उसाचे गाळप

एफआरपी थकलेल्या व आर्थिक कारणामुळे अद्यापही १६ साखर कारखान्यांचे गाळप सुरू झालेले नाही. पाऊस चांगला पडल्याने पिकांसाठी पाण्याची अडचण नव्हती.

एफआरपी थकलेल्या व आर्थिक कारणामुळे अद्यापही १६ साखर कारखान्यांचे गाळप सुरू झालेले नाही. पाऊस चांगला पडल्याने पिकांसाठी पाण्याची अडचण नव्हती.

सोलापूर : जिल्ह्यातील गाळपासाठी सज्ज असलेल्या ३८ साखर कारखान्यांपैकी अवघ्या २२ साखर कारखान्यांच्या गाळपाची साखर आयुक्त कार्यालयाकडे नोंद असून, २२ लाख ९५ हजार मे. टन इतके गाळप झाले आहे.

एफआरपी थकलेल्या व आर्थिक कारणामुळे अद्यापही १६ साखर कारखान्यांचे गाळप सुरू झालेले नाही. पाऊस चांगला पडल्याने पिकांसाठी पाण्याची अडचण नव्हती.

त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ऊसलागवड मोठ्या प्रमाणावर केली. त्यामुळे यंदा गाळपासाठी ऊस भरपूर उपलब्ध आहे.

यंदा उशिरापर्यंत पाऊस पडल्याने साखर हंगाम लवकर सुरू होण्यास अडचण होती. मात्र आता ऊस तोडणीसाठी अडचण राहिली नसताना बरेच साखर कारखाने सुरू झाले नाहीत.

जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांचे गाळप सुरू झाल्याची सोलापूर प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडे नोंद आहे.

त्यापेक्षा अधिक कारखाने सुरू झाले असले तरी त्यांची नोंद साखर आयुक्त कार्यालयाकडे नाही. २० दिवसांत २२ साखर कारखान्यांचे २२ लाख ९५ हजार मे. टन गाळप झाले आहे.

गाळप सुरू असलेले साखर कारखाने
सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील
शंकर सहकारी
विठ्ठल सहकारी गुरसाळे
पांडुरंग श्रीपूर
संत दामाजी मंगळवेढा
धाराशिव साखर (जुना सांगोला)
विठ्ठलराव शिंदे-पिंपळनेर
विठ्ठलराव शिंदे-करकंब
संत कुर्मदास
लोकनेते बाबूराव पाटील-अनगर
दि सासवड माळीनगर
ओंकार (विठ्ठल कॉर्पोरेशन)
सिद्धनाथ शुगर तिर्हे
येडेश्वरी खामगाव
सीताराम महाराज-खर्डी
ओंकार शुगर चांदापुरी
अवताडे शुगर
युटोपियन शुगर
भैरवनाथ लवंगी
भैरवनाथ आलेगाव
आष्टी शुगर
व्ही. पी. शुगर
बबनराव शिंदे शुगर

अधिक वाचा: प्रोत्साहन योजनेसाठी राज्य सरकार कशी करणार साखर कारखान्यांची निवड? काय आहेत निकष?

Web Title : सोलापुर की 22 चीनी मिलों ने 23 लाख मीट्रिक टन गन्ने की पेराई की

Web Summary : सोलापुर में, 38 चीनी मिलों में से 22 ने 23 लाख मीट्रिक टन गन्ने की पेराई की। वित्तीय समस्याओं के कारण सोलह कारखाने शुरू नहीं हुए हैं। अच्छी बारिश के कारण गन्ने की खेती में वृद्धि हुई, जिससे शुरुआती देरी के बावजूद पेराई के लिए पर्याप्त उपलब्धता सुनिश्चित हुई।

Web Title : Solapur's 22 Sugar Factories Crush 2.3 Million Metric Tons of Sugarcane

Web Summary : In Solapur, 22 out of 38 sugar factories crushed 2.3 million metric tons of sugarcane. Sixteen factories haven't started due to financial issues. Good rainfall led to increased sugarcane cultivation, ensuring ample availability for crushing despite initial delays.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.