Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' १२ साखर कारखान्यांनी जाहीर केली पहिली उचल; जाणून घ्या सविस्तर

कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' १२ साखर कारखान्यांनी जाहीर केली पहिली उचल; जाणून घ्या सविस्तर

These 12 sugar factories in Kolhapur district have announced their first frp installment; know the details | कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' १२ साखर कारखान्यांनी जाहीर केली पहिली उचल; जाणून घ्या सविस्तर

कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' १२ साखर कारखान्यांनी जाहीर केली पहिली उचल; जाणून घ्या सविस्तर

जोपर्यंत 'एफआरपी'चा ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत जिल्ह्यातील एकाही कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.

जोपर्यंत 'एफआरपी'चा ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत जिल्ह्यातील एकाही कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.

कोल्हापूर : मागील हंगामातील प्रतिटन दोनशे रुपयांसह एफआरपीचे पैसे थकवलेल्या आठ कारखाने व चालू हंगामातील एफआरपीपेक्षा कमी उचल देऊन हंगाम सुरू करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा.

जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत जिल्ह्यातील एकाही कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. एकाही कारखान्याचे धूराडे आजपासून पेटू देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. शेट्टी म्हणाले, गेल्या हंगामात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करून तोडगा काढला होता.

त्यानुसार किती कारखान्यांनी ५० व १०० रुपये दिले. ऊस तोडणी-ओढणीमध्ये मनमानी कपात करून फसव्या एफआरपीतून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे.

एकाच तालुक्यातील तुटलेल्या उसाचे गाळप करणाऱ्या दोन कारखान्यांची एफआरपी वेगळी कशी? ही मखलाशी खपवून घेणार नसून कायद्यानुसार पैसे द्या अन्यथा गाठ शेतकऱ्यांशी आहे.

मागील हंगामातील एफआरपी थकवणाऱ्या कारखान्यांवर काय कारवाई केली? अशी विचारणा करत आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे म्हणाले, जिल्ह्यातील आठ कारखान्यांनी उच्च न्यायालयाचा अवमान करणाऱ्यांना गाळप परवाना दिलाच कसा?

तातडीने हे कारखाने बंद करा. दरम्यान, याबाबत गुरुवारी (दि. ६) पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोबत ऊस दराबाबत बैठक आयोजित केल्याचे जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले. 

कारखान्यांची एफआरपी व जाहीर केलेली उचल प्रतिटन

कारखानाएफआरपी (₹)पहिली उचल (₹)फरक (₹)
बिद्री३५५२३४५११००
भोगावती३६५२३४००२५२
कुंभी३५५८३५००५८
दालमिया३६४२३५२५१४७
शाहू३३८०३४००२०
मंडलिक३४१०३४१०-
दत्त शिरोळ३३७७३४००२३
पंचगंगा३५१८३५१८-
शरद३२२६अद्याप जाहीर नाही-
डी. वाय. पाटील३३२५३४००-
गायकवाड३२७५अद्याप जाहीर नाही-
गुरुदत्त३२५०३४००-
घोरपडे३३६९३४००-
नलवडे३१००अद्याप जाहीर नाही-
अथणी तांबाळे३०८०३४००-

अध्यक्षांना कमीपणा वाटतोय का?
बैठकीला कारखान्यांचे अध्यक्ष का आले नाहीत..? यावर हरकत घेत शेट्टी म्हणाले, कार्यकारी संचालक निर्णय घेणार आहेत का? बैठकीत येऊन शेतकऱ्यांना हिशोब सांगायला अध्यक्षांना कमीपणा वाटतोय का..?

मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा
ऊस दराबाबत मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून ठोस निर्णय घ्यावा. अन्यथा बुधवारी त्यांना कोल्हापुरात विचारू, असेही शेट्टी यांनी सांगितले.

अधिक वाचा: एफआरपी थकविल्याने 'या' कारखान्यांचे गाळप परवाने साखर आयुक्त कार्यालयाने नाकारले

Web Title : कोल्हापुर चीनी मिलों ने किसान विरोध के बीच पहली किस्त की घोषणा की

Web Summary : कोल्हापुर की चीनी मिलों ने अपनी पहली FRP किस्त की घोषणा की, जिससे राजू शेट्टी के नेतृत्व में देरी से भुगतान और विसंगतियों को लेकर विरोध प्रदर्शन शुरू हो गया। जिला अधिकारियों के साथ एक बैठक हुई, और किसानों को उचित मुआवजा सुनिश्चित करने के लिए अभिभावक मंत्री के साथ एक अनुवर्ती कार्रवाई की योजना बनाई गई है।

Web Title : Kolhapur Sugar Factories Announce First Installment Amid Farmer Protests

Web Summary : Kolhapur sugar factories announced their first FRP installment, sparking protests led by Raju Shetti over delayed payments and discrepancies. A meeting was held with district officials, and a follow-up with the Guardian Minister is planned to resolve the ongoing issues and ensure fair compensation for farmers.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.