Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > द्राक्षांच्या सालीवर दिसणारा पांढरट थर नैसर्गिकच; नक्की तो थर कशाचा आहे? वाचा सविस्तर

द्राक्षांच्या सालीवर दिसणारा पांढरट थर नैसर्गिकच; नक्की तो थर कशाचा आहे? वाचा सविस्तर

The white layer on the skin of grapes is natural; what exactly is that layer? Read in detail | द्राक्षांच्या सालीवर दिसणारा पांढरट थर नैसर्गिकच; नक्की तो थर कशाचा आहे? वाचा सविस्तर

द्राक्षांच्या सालीवर दिसणारा पांढरट थर नैसर्गिकच; नक्की तो थर कशाचा आहे? वाचा सविस्तर

grape white bloom बाजारात येणाऱ्या द्राक्षांच्या सालीवर दिसणाऱ्या पांढरट थरावरून काही ठिकाणी गैरसमज पसरत आहेत.

grape white bloom बाजारात येणाऱ्या द्राक्षांच्या सालीवर दिसणाऱ्या पांढरट थरावरून काही ठिकाणी गैरसमज पसरत आहेत.

कवठेमहांकाळ : बाजारात येणाऱ्या द्राक्षांच्या सालीवर दिसणाऱ्या पांढरट थरावरून काही ठिकाणी गैरसमज पसरत आहेत.

मात्र, हा थर नैसर्गिक असल्याचे सांगत महाराष्ट्र राज्य द्राक्ष बाजार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी या 'व्हाइट ब्लूम'च्या कारणांवर प्रकाशझोत टाकला.

संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण म्हणाले, द्राक्षे परिपक्व झाली की त्यांच्या सालीवर 'व्हाइट ब्लूम' दिसतो. यामुळे द्राक्षांचा ताजेपणा टिकतो.

द्राक्षांचे आरोग्यदायी फायदे
◼️ द्राक्षे ही चविष्ट आणि पौष्टिक फळांपैकी एक असून त्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, अँटीऑक्सिइंटस आणि नैसर्गिक साखर मुबलक प्रमाणात असते.
◼️ नियमित सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
◼️ तसेच हृदयाचे आरोग्य सुधारते, त्वचा तजेलदार राहते आणि पचनक्रिया सुरळीत राहण्यासही मदत होते.

ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?
◼️ तज्ज्ञांच्या मते, कोणतेही फळ खाण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने धुणे ही चांगली सवय आहे.
◼️ द्राक्षेही धुऊन खाल्ल्यास धूळ किंवा इतर बाह्य घटक दूर होण्यास मदत होते.

नैसर्गिक थराने अनेक फायदे
◼️ मारुती चव्हाण म्हणाले की, नैसर्गिक थरामुळे द्राक्षांना अनेक फायदे मिळतात.
◼️ पाण्याची अनावश्यक बाष्पीभवन कमी होते, बुरशी व रोगांपासून संरक्षण मिळते.
◼️ साठवण क्षमता वाढते आणि द्राक्षांना आकर्षक 'एक्सपोर्ट क्वालिटी' लूक प्राप्त होतो

नैसर्गिक ब्लूममध्ये विविध घटकांचा समावेश
◼️ चव्हाण म्हणाले, नैसर्गिक ब्लूममध्ये प्रामुख्याने ओलिनोलिक अ‍ॅसिड, वॅक्स एस्टर्स, लांब साखळीचे फॅटी अ‍ॅसिड, अल्केन्स, फॅटी अल्कोहोल्स, ट्रायटरपेनॉइड संयुगे, तसेच राळसदृश घटकांचा समावेश असतो.
◼️ हे सर्व घटक सालीवर अतिशय सूक्ष्म मेणाच्या क्रिस्टल्सचा थर तयार करतात. त्यामुळे हा थर हात लावल्यावर सहज निघतो.

अधिक वाचा: द्राक्ष शेतीतून नगर जिल्ह्यातील 'हे' गाव झालं करोडपती; जमिनीचा दर चाललाय एकरी ५० ते ६० लाख रुपये

Web Title : अंगूर पर सफेद परत प्राकृतिक है; जानिए क्या है ये!

Web Summary : अंगूर पर सफेद परत प्राकृतिक है, जो ताजगी का संकेत है और नमी बनाए रखने व रोगों से बचाने जैसे फायदे देती है। यह प्राकृतिक मोम और एसिड से बनी होती है, जो धोने से आसानी से निकल जाती है। अंगूर पौष्टिक होते हैं, जो प्रतिरक्षा, हृदय स्वास्थ्य और पाचन को बढ़ावा देते हैं। खाने से पहले धो लें।

Web Title : White layer on grapes is natural; Know what it is.

Web Summary : The white bloom on grapes is natural, indicating freshness and offering benefits like moisture retention and disease protection. It's composed of natural waxes and acids, easily removed by washing. Grapes are nutritious, boosting immunity, heart health, and digestion. Wash before eating.