Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >लै भारी > द्राक्ष शेतीतून नगर जिल्ह्यातील 'हे' गाव झालं करोडपती; जमिनीचा दर चाललाय एकरी ५० ते ६० लाख रुपये

द्राक्ष शेतीतून नगर जिल्ह्यातील 'हे' गाव झालं करोडपती; जमिनीचा दर चाललाय एकरी ५० ते ६० लाख रुपये

This village in Nagar district has become a millionaire through grape farming; Land prices are running at Rs 50 to 60 lakh per acre | द्राक्ष शेतीतून नगर जिल्ह्यातील 'हे' गाव झालं करोडपती; जमिनीचा दर चाललाय एकरी ५० ते ६० लाख रुपये

द्राक्ष शेतीतून नगर जिल्ह्यातील 'हे' गाव झालं करोडपती; जमिनीचा दर चाललाय एकरी ५० ते ६० लाख रुपये

पानाच्या शेतीसाठी प्रसिद्ध असलेले पारगाव सुद्रिक हे गाव नंतर लिंबू बागांकडे वळले. १९७६ मध्ये दिवंगत मधुकर हिरवे यांनी गावात द्राक्षाची पहिली बाग लावली.

पानाच्या शेतीसाठी प्रसिद्ध असलेले पारगाव सुद्रिक हे गाव नंतर लिंबू बागांकडे वळले. १९७६ मध्ये दिवंगत मधुकर हिरवे यांनी गावात द्राक्षाची पहिली बाग लावली.

बाळासाहेब काकडे
श्रीगोंदा : पानाच्या शेतीसाठी प्रसिद्ध असलेले पारगाव सुद्रिक हे गाव नंतर लिंबू बागांकडे वळले. १९७६ मध्ये दिवंगत मधुकर हिरवे यांनी गावात द्राक्षाची पहिली बाग लावली.

त्यानंतर ५० वर्षात पारगावने द्राक्ष उत्पादनात ३०० कोटींचा टप्पा पार केला असून, पारगाव आता द्राक्ष शेतीचे 'हब' बनले आहे.

पारगाव सुद्रिकची माती लालसर. गावकऱ्यांना या लाल मातीतूनच भविष्य घडविण्याचे वेड.. त्यामुळे कोणी नोकरीच्या मागे धावताना दिसत नाही.

शेतीतून शाश्वत रोजगाराची दारे खुली होत असताना, पाच हजार तरुणांना रोजगार, शिवाय कृषी सेवा केंद्र व इतर शेतीपूरक व्यवसायांनाही बळ मिळाले आहे.

पारगाव व खेतमाळीस वाडीचे २३०० हेक्टर क्षेत्र. त्यात १२५० हेक्टरवर सुधारित जातीच्या द्राक्ष बागा बहरल्या आहेत. गावातील ९५ टक्के शेतकऱ्यांकडे द्राक्ष बागा आहेत.

त्यातून शेतकऱ्यांची लाईफ स्टाईलही 'हाय प्रोफाईल' झाली आहे. येथील जमिनीचा एकरी दर ५० ते ६५ लाखांच्या घरात आहे. गावकऱ्यांनी सुद्रिकेश्वर महाराजांचे सात कोटींचे मंदिर उभारले आहे.

द्राक्ष शेतीचे आयडॉल
मधुकर हिरवे यांनी १९७६ मध्ये सात एकरांवर द्राक्ष बाग केली अन् पानाचे मळे व लिंबोणी बागांच्या प्रेमात असलेले पारगावकर हळूहळू द्राक्ष शेतीकडे वळले. पारगावकर हे तालुक्याचे द्राक्ष शेतीचे आयडॉल ठरले.

मैत्रीतून करोडपती
◼️ जयदीप शिवाजीराव जगताप यांना वडिलोपार्जित २४ एकर शेती. वडील राजकारणात सक्रिय असल्याने शेतीकडे दुर्लक्ष झाले.
◼️ बापू लडकत या युवा शेतकरी मित्राने जयदीप जगताप यांना द्राक्ष शेतीच्या टिप्स दिल्या.
◼️ यावर्षी १४ एकर द्राक्ष शेतीतून त्यांनी सुमारे दोन कोटींचे उत्पादन घेतले. एकमेकांच्या मैत्रीतून द्राक्ष शेतीचा वेल यशोशिखरावर गेला.

पारगाव सुद्रिक येथील तरुणांनी धाडस दाखवत भांडवली द्राक्ष शेतीचे स्वीकारले नियोजन अदातून जा क्षारात यशस्वी केली. गावाची लाइफलाइन बदलली. यंदा अमेरिका-इराण युद्धामुळे द्राक्षाला २० टक्के भाव कमी मिळाला, अन्यथा यंदा गावाची उलाढाल ३५० कोटींवर गेली असती. - बापू लडकत, द्राक्ष उत्पादक

अधिक वाचा: अफवांच्या वणव्यात केवळ कलिंगडच नव्हे तर शेतकऱ्यांच्या आशाही भस्मसात; काय आहे वस्तुस्थिती?

Web Title : अंगूर की खेती से नगर का गाँव बना करोड़पति; ज़मीन लाखों में।

Web Summary : पारगाँव सुद्रिक अंगूर की खेती का केंद्र बना, ₹300 करोड़ का कारोबार हुआ। मधुकर हिरवे से प्रेरित होकर ग्रामीणों ने अंगूर की खेती अपनाई, जिससे ज़मीन की कीमतें ₹50-65 लाख प्रति एकड़ हो गईं। दोस्ती और साझा ज्ञान ने किसानों को सफलता दिलाई, जिससे रोजगार के अवसर बने।

Web Title : Grape farming makes Nagar's village millionaires; land costs lakhs.

Web Summary : Pargaon Sudrik transformed into a grape-farming hub, achieving ₹300 crore turnover. Villagers, inspired by Madhukar Hirve, embraced grape cultivation, raising land prices to ₹50-65 lakh per acre. Friendship and shared knowledge propelled farmers to success, creating abundant employment opportunities.