शेतीत काम करताना होणाऱ्या अपघातांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास तातडीने आर्थिक मदत देण्यासाठी सुरू असलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरीअपघात सुरक्षा सानुग्रह योजनेची प्रक्रिया ऑनलाईन झाली आहे.
महाडीबीटी पोर्टलमार्फत अर्ज, छाननी आणि मंजुरी आदी सर्व प्रक्रिया होणार असून, मदत थेट बँक खात्यात जमा होईल.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना ही शेती करताना अपघाती मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देणारी योजना आहे.
अपघाती मृत्यूनंतर दोन लाख
अपघाती मृत्यू झाल्यास शेतकऱ्यास २ लाख रुपये मिळतात. तर कायमचे अपंगत्व आल्यास म्हणजे एक डोळा किंवा एक अवयव निकामी झाल्यास १ लाख रुपये मिळणार आहेत.
आता सर्व प्रक्रिया 'महाडीबीटी' मार्फत
सर्व प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन झाली आहे आणि ती महाडीबीटी पोर्टलमार्फत राबवली जात आहे, ज्यामुळे अर्ज करणे, छाननी आणि अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणे हे सर्व पारदर्शक आणि वेगाने होत आहे.
कोणकोणत्या घटकांसाठी मिळते मदत?
◼️ अपघात : शेतीत काम करताना होणारे विविध अपघात.
◼️ बुडून मृत्यू : शेतीशी संबंधित कारणांमुळे पाण्यात बुडून मृत्यू झाल्यास मदत मिळते.
◼️ सर्पदंश : सापाने दंश केल्यामुळे होणारा मृत्यू किंवा अपंगत्व.
◼️ विंचूदंश : विंचू चावल्यामुळे होणारा मृत्यू किंवा अपंगत्व.
◼️ विजेचा धक्का : शेतीकामादरम्यान विजेचा धक्का लागल्याने मृत्यू किंवा अपंगत्व.
◼️ नैसर्गिक आपत्ती : वीज पडणे, पूर इ.
◼️ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे अपघात.
◼️ इतर : रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, जंतुनाशकांची विषबाधा, इत्यादींमुळे होणारे अपघात.
अधिक वाचा: Saur Krushi Pump : आता दहा टक्के रक्कम भरा आणि सौर कृषिपंप मिळवा; काय आहे योजना?
