Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > लिहा येथील शेतकऱ्याची कन्या जिद्द अन् जिकाटीच्या जोरावर बनली न्यायाधीश; आरती सोनुणे यांचा संघर्षमय प्रवास

लिहा येथील शेतकऱ्याची कन्या जिद्द अन् जिकाटीच्या जोरावर बनली न्यायाधीश; आरती सोनुणे यांचा संघर्षमय प्रवास

The daughter of a farmer from Liha became a judge through determination and perseverance; Aarti Sonune's journey of struggle | लिहा येथील शेतकऱ्याची कन्या जिद्द अन् जिकाटीच्या जोरावर बनली न्यायाधीश; आरती सोनुणे यांचा संघर्षमय प्रवास

लिहा येथील शेतकऱ्याची कन्या जिद्द अन् जिकाटीच्या जोरावर बनली न्यायाधीश; आरती सोनुणे यांचा संघर्षमय प्रवास

जिद्द आणि चिकाटी असेल तर ग्रामीण भागातील तरुण-तरुणी आभाळाला गवसणी घालू शकतात, हे लिहा येथील कन्या आरती ज्ञानेश्वर सोनुणे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात त्यांची दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी (JMFC) पदी निवड झाली.

जिद्द आणि चिकाटी असेल तर ग्रामीण भागातील तरुण-तरुणी आभाळाला गवसणी घालू शकतात, हे लिहा येथील कन्या आरती ज्ञानेश्वर सोनुणे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात त्यांची दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी (JMFC) पदी निवड झाली.

अय्युब पठाण 

जिद्द आणि चिकाटी असेल तर ग्रामीण भागातील तरुण-तरुणी आभाळाला गवसणी घालू शकतात, हे जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील लिहा येथील कन्या आरती ज्ञानेश्वर सोनुणे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात त्यांची दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी (JMFC) पदी निवड झाली.

या यशामुळे सोनुणे कुटुंबासह भोकरदन तालुक्याचा अभिमान वाढला आहे. आरती सोनुणे यांचा शैक्षणिक प्रवास अत्यंत संघर्षमय राहिला आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण मामाच्या गावी हिसोडा (ता. भोकरदन) येथील जिल्हा परिषद शाळेत १ ली ते ७ वी पर्यंत झाले. त्यानंतर त्यांनी विद्या विकास माध्यमिक विद्यालय, हिसोडा येथे ८ वी ते १२ वीपर्यतचे शिक्षण पूर्ण केले.

सोनुणे कुटुंबात तीन बहिणी असून, एक बहीण शिक्षिका म्हणून कार्यरत आहे, तर दुसरी शिक्षण घेत आहे. ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणासमोर असलेल्या अडचणींवर मात करत या कुटुंबाने शिक्षणाचा आदर्श घालून दिला आहे. या यशाबद्दल माजी आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे, सुधाकर पुंडलिकराव दानवे, शिक्षक डी. डी. गोरे यांनी तिचे कौतुक केले. हा तिचा प्रवास इतरांसाठी प्रेरणादायी आहे.

ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणादायी यश

आरती सोनुणे यांची ही निवड केवळ वैयक्तिक यश नसून ग्रामीण भागातील प्रत्येक मुलीसाठी प्रेरणादायी ठरली आहे. "आरती यांच्या कष्टाला अखेर यशाचे फळ मिळाले आहे. ग्रामीण भागातील मुलगी न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसणार, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे," असे मत शिक्षक ज्ञानेश्वर गोरे यांनी व्यक्त केले.

भोकरदन तालुक्याचा गौरव

• आरती यांचे वडील ज्ञानेश्वर सोनुणे हे अल्पशिक्षित (१०वी उत्तीर्ण) असून, आई ४ थी उत्तीर्ण आहे. शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबात शिक्षणाची मोठी जिद्द होती. मुलीने उच्च शिक्षण घ्यावे, ही त्यांची इच्छा होती.

• आरती यांना काका न्यायाधीश सुधाकर नारायण सोनुणे यांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन व पाठबळ दिले. काकांच्या मार्गदर्शनाखाली आरती यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण करून एमपीएससी अंतर्गत न्यायाधीशपदाची परीक्षा दिली आणि यश संपादन केले.

हेही वाचा : अल्पभूधारक बाळासाहेबांच्या जिद्द, कष्टाला आले यश; चार गुंठ्यांच्या पुदिना शेतीतून उत्पन्न पाच लाख

Web Title : किसान की बेटी बनी जज: आरती सोनुने की प्रेरणादायक संघर्ष गाथा

Web Summary : लीहा की किसान परिवार की आरती सोनुने विपरीत परिस्थितियों से लड़कर जज बनीं। उनकी सफलता, दृढ़ संकल्प और पारिवारिक समर्थन से प्रेरित है, ग्रामीण लड़कियों को प्रेरित करती है। उन्होंने जेएमएफसी परीक्षा पास की, साबित किया कि कड़ी मेहनत रंग लाती है। यह भोकरदन के लिए गर्व का क्षण है।

Web Title : Farmer's Daughter Becomes Judge Through Perseverance: Aarti Sonune's Inspiring Journey

Web Summary : Aarti Sonune, from a farming family in Liha, overcame adversity to become a judge. Her success, fueled by determination and family support, inspires rural girls. She cleared the JMFC exam, proving hard work pays off. This is a proud moment for Bhokardan.