Lokmat Agro >शेतशिवार > गुणकारी शेवगा आरोग्यासाठी ठरेल वरदान; वाचा शेवग्याचे आरोग्यदायी फायदे

गुणकारी शेवगा आरोग्यासाठी ठरेल वरदान; वाचा शेवग्याचे आरोग्यदायी फायदे

The beneficial properties of Shevga will be a boon for health; Read the health benefits of Shevga | गुणकारी शेवगा आरोग्यासाठी ठरेल वरदान; वाचा शेवग्याचे आरोग्यदायी फायदे

गुणकारी शेवगा आरोग्यासाठी ठरेल वरदान; वाचा शेवग्याचे आरोग्यदायी फायदे

शेवगा, ज्याला "ड्रमस्टिक" म्हणूनही ओळखले जाते. शेवगा एक अत्यंत पोषक आणि आरोग्यदायी शेंगभाजी आहे. भारतात तसेच जगभरात शेवग्याला सुपरफूड म्हणून मान्यता देखील मिळालेली आहे. कारण यात शरीराला आवश्यक पोषकतत्त्वे भरपूर प्रमाणात आढळतात.

शेअर :

Join us
Join usNext

शेवगा, ज्याला "ड्रमस्टिक" म्हणूनही ओळखले जाते. शेवगा एक अत्यंत पोषक आणि आरोग्यदायी शेंगभाजी आहे. भारतात तसेच जगभरात शेवग्याला सुपरफूड म्हणून मान्यता देखील मिळालेली आहे. कारण यात शरीराला आवश्यक पोषकतत्त्वे भरपूर प्रमाणात आढळतात.

शेवग्याची शेंग ही केवळ चवदारच नाही तर आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले पोषणतत्त्व शरीराला विविध प्रकारे मदत करतात. चला तर जाणून घेऊया याच शेवग्याच्या शेंगाचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया.

मधुमेहींसाठी फायदेशीर

मधुमेहींसाठी शेवग्याची शेंग खूप उपयुक्त आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास किडनीवर त्याचा परिणाम होतो. हा धोका कमी करण्यासाठी शेवग्याची शेंग आहारात समाविष्ट करा. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

रक्त शुद्धीकरणासाठी उपयुक्त

शेवग्याची शेंग रक्तातील घातक आणि टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे कार्य करते. तिच्या पाल्यात असलेले अँटीबायोटिक गुणधर्म आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. शेवग्याच्या पाल्याची भाजी किंवा सूप आहारात घेतल्यास रक्त शुद्ध होण्यास मदत होते. यामुळे किडनीवर होणारा परिणाम कमी होतो.

हाडं मजबूत होतात

हाडं ठिसुळ झाल्यास रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शियम साचण्याचा धोका असतो, विशेषतः किडनीजवळ. शेवग्याच्या शेंगेमध्ये कॅल्शियम, आयर्न आणि आवश्यक व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. हे हाडांना बळकटी देतात आणि ठिसुळपणा टाळण्यास मदत करतात.

पचन सुधारते

चांगल्या पचनामुळे शरीरात पोषकघटकांचे शोषण चांगले होते. शेवग्याची शेंग आणि पाला हे व्हिटॅमिनयुक्त असल्यामुळे पचनक्रिया सुधारते. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स यांचे पचन चांगल्या प्रकारे होते.

शेवग्याचे पोषणमूल्य

शेवग्यात व्हिटॅमिन C, A, आणि B-complex भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय, कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम, मॅग्नेशियम यासारखी खनिजेही भरपूर असतात. हे पोषकतत्त्वे हाडे मजबूत करणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, आणि शरीरात उर्जेचे संतुलन राखण्यात मदत करतात.

शेवग्याचा वापर कसा करावा?

शेवगा विविध प्रकारे खाल्ला जातो. तुम्ही शेवग्याची भाजी, पराठे, सूप, आणि कोशिंबीर यामध्ये वापरू शकता. शेवग्याच्या पानांचाही उपयोग चहा बनवण्यासाठी किंवा सूपमध्ये होतो.

शेवग्याचे काही महत्त्वाचे टिप्स

• नेहमी ताज्या शेवग्याचा वापर करा, कारण तो अधिक पोषक असतो.

• जास्त शिजवू नका; यामुळे पोषकतत्त्वे कमी होतात.

• गरोदर महिला, वृद्ध लोक, आणि मुलांनी याचा योग्य प्रमाणात वापर करावा.

हेही वाचा : कामाच्या आवाक्यात उद्भवू शकतो आजार; शेतकरी बांधवांनो हाडांच्या समस्येकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका

Web Title: The beneficial properties of Shevga will be a boon for health; Read the health benefits of Shevga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.