Lokmat Agro >शेतशिवार > Tembhurne Healthy Fruit: तुम्हाला 'टेंभुर्णे' फळ माहित आहे का? वाचा त्याचे आरोग्यदायी फायदे

Tembhurne Healthy Fruit: तुम्हाला 'टेंभुर्णे' फळ माहित आहे का? वाचा त्याचे आरोग्यदायी फायदे

Tembhurne Healthy Fruit: latest news Do you know Tembhurne fruit? Read its health benefits | Tembhurne Healthy Fruit: तुम्हाला 'टेंभुर्णे' फळ माहित आहे का? वाचा त्याचे आरोग्यदायी फायदे

Tembhurne Healthy Fruit: तुम्हाला 'टेंभुर्णे' फळ माहित आहे का? वाचा त्याचे आरोग्यदायी फायदे

Tembhurne Healthy Fruit : आरोग्यासाठी उपयुक्त असलेले 'टेंभुर्णे' (Tembhurne) हे पारंपरिक फळ आज दुर्लक्षित बनले आहे. पूर्वी लहान मुले माळरानातून हे फळ आनंदाने गोळा करत, राखेत पिकवून त्याची गोडसर चव घेत असत. या फळाचे अनेक फायदे आहेत. वाचा सविस्तर (Tembhurne Healthy Fruit)

Tembhurne Healthy Fruit : आरोग्यासाठी उपयुक्त असलेले 'टेंभुर्णे' (Tembhurne) हे पारंपरिक फळ आज दुर्लक्षित बनले आहे. पूर्वी लहान मुले माळरानातून हे फळ आनंदाने गोळा करत, राखेत पिकवून त्याची गोडसर चव घेत असत. या फळाचे अनेक फायदे आहेत. वाचा सविस्तर (Tembhurne Healthy Fruit)

शेअर :

Join us
Join usNext

Tembhurne Healthy Fruit : आरोग्यासाठी उपयुक्त असलेले 'टेंभुर्णे' (Tembhurne) हे पारंपरिक फळ आज दुर्लक्षित बनले आहे. पूर्वी लहान मुले माळरानातून हे फळ आनंदाने गोळा करत, राखेत पिकवून त्याची गोडसर चव घेत असत. या फळाचे अनेक फायदे आहेत.(Tembhurne Healthy Fruit)

हे फक्त एक फळ नाही, तर आरोग्याचा नैसर्गिक खजिना आहे. अशा या स्थानिक फळांची शाळा, आहारतज्ज्ञ आणि प्रशासनाच्या माध्यमातून पुन्हा ओळख करून देणे गरजेचे आहे.(Tembhurne Healthy Fruit)

अनेक जीवनसत्त्व असलेले फळ, रोगप्रतिकारक शक्तीही वाढवते. टेंभुर्णे फळात अँटीऑक्सिडंट्स (Antioxidants), फायबर्स, तसेच जीवनसत्त्व 'ए' आणि 'सी' भरपूर प्रमाणात असते.

हे फळ पचन सुधारण्यास मदत करते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि मधुमेहासारख्या आजारांवरही उपयुक्त मानले जाते. ग्रामीण भागात हे फळ प्रसिध्द आहे. टेंभुर्णी हे फळ मार्च एप्रिलच्या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात येतात. या फळामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत मिळते.((Tembhurne Healthy Fruit))

'या' भागात मोठ्या प्रमाणात आढळते

'टेंभुर्णे' हे फळ महाराष्ट्रात मुख्यतः विदर्भ आणि मराठवाडा भागात आढळते, विशेषतः ग्रामीण व माळरान भागात हे फळ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. याला ग्रामीण भाषेत टेंभुर्णी, टेंभुर्णा, टेंभुरही म्हणतात. आरोग्यासाठी उत्तम असे फळ मानले जाते.

'टेंभुर्णे' फळाचे आरोग्यदायी फायदे

* पचनक्रिया सुधारते : 'टेंभुर्णे' फळात फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करते.

* रोगप्रतिकारशक्ती वाढवते : यात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि हानिकारक घटकांपासून संरक्षण करतात.

* अँटीऑक्सिडंट्सचा स्रोत : हे फळ अँटीऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे, ज्यामुळे शरीरातील पेशींची ज्वलनशील प्रक्रिया कमी होते.

* रक्तदाब नियंत्रित करते : 'टेंभुर्णे' फळात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने ते रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

* हृदयविकार टाळण्यास मदत करते : अँटीऑक्सिडंट्स आणि फायबरच्या मदतीने हे फळ हृदयविकार होण्याचा धोका कमी करते.

* त्वचेसाठी चांगले : 'टेंभुर्णे' फळात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करतात.

'टेंभुर्णे' फळाचा वापर

* 'टेंभुर्णे' हे फळाला तुम्ही थेट खाऊ शकता.

* 'टेंभुर्णे' फळाचा अर्क काढून पेय (juice) बनवता येते.

* 'टेंभुर्णे' फळाचा उपयोग अनेक पदार्थांमध्ये चव अथवा मसाला म्हणून वापर केला जातो.

* 'टेंभुर्णे' फळाचा अत्तर बनवून ते त्वचेसाठी वापरले जाते.

* 'टेंभुर्णे' फळ अनेक पारंपरिक औषधोपचारांमध्ये वापरले जाते.

'टेंभुर्णे' हे फळ विस्मृतीत न जाता, आरोग्यसंपन्न जीवनशैलीचा भाग व्हावा, अशी अपेक्षा शेतकरी आणि आरोग्यप्रेमी व्यक्त करतात.

हे ही वाचा सविस्तर: Gopaalan : 'राजमाते'च्या संगोपनाला गोपालकांचा का आहे नकार जाणून घ्या सविस्तर

Web Title: Tembhurne Healthy Fruit: latest news Do you know Tembhurne fruit? Read its health benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.