कोकोपीटसह ऊस बियाणे यांची वाहतूक खर्च, अवकाळी पावसाचा फटका आदी कारणांमुळे रोपनिर्मिती महागली असल्याचे दिसून येत आहे.
उसाची लागण करून लागणारा कालावधी, उगवण क्षमतेची हमी नसल्याने अलीकडच्या काळात काही शेतकरीऊस रोपवाटिकामध्ये तयार केलेली रोपे आणून उसाची लागण करू लागले आहेत.
सध्या जून ते ऑगस्ट महिन्यात आडसाली उसाच्या लागणी होत असतात. तयार रोपांची लागण केल्यास रोपांची मर होत नाही. त्यासाठी तयार रोपांची लागण करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो.
यंदाच्या हंगामात रोपे तयार करण्याच्या साहित्यात वाढ झाल्याने रोपांचे दर दहा टक्के वाढले आहेत. हेच दर थोड्या फरकाच्या अंतरावर रोपवाटिकेत वेगवेगळे दर दिसत आहेत. अनेक रोपवाटिकांना पावसाचा फटका बसून त्यांचे नुकसान झाले.
गेल्यावर्षी उसाचे रोप तयार करण्यासाठी कोकोपीटचा टनाचा दर ५५०० रुपये होता. तर सध्याचा दर ६५०० आहे स्ट्रेचा दर ७ रुपये ५० पैसे होता. त र सध्याचा दर १० रुपये आहे. गेल्यावर्षी एका रोपाचा दर २ रुपये ३० पैसे होता.
रोपवाटिकांना वळवाच्या पावसाचा जोरदार फटका
कोकोपीट हे केरळ राज्यातून येते. उसाची वाढ होण्यासाठी कोकोपीट खत म्हणून वापरले जाते. त्यामुळे रोपे जोमदार तयार होतात त्यामुळे त्याला मागणी असते; मात्र पावसाचा फटका रोपवाटिका मालकांना बसत आहे.
कोकोपीटमध्ये तयार झालेली रोपे सशक्त
सरळ पद्धतीने उसाच्या कांड्याची लागण केल्यास वेळ वाया जातो. जमीनीची मशागत करताना अनेक अडचणी असतात रोपांची उगवण व्यवस्थित होत नाही. तर कोकोपीटमध्ये तयार झालेली रोपे सशक्त असतात रोगाला बळी पडत नाहीत.
कोकोपीट बाहेरील राज्यातून येत असल्याने वाहतुकीच्या दरात वाढ झाली आहे. तसेच ऊस बियाणांच्या दरात वाढ झाल्याने परिणामी रोपनिर्मितीच्या खर्चात वाढ झाल्याने, नाईलाजाने दर वाढ अटळ आहे. - युवराज चव्हाण, रोपवाटिका मालक, कोपर्डे हवेली
अधिक वाचा: आता या प्रकारातील जमिनी सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय विकता येणार नाहीत; वाचा सविस्तर