Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Sour Gram : महावितरणची नवी योजना प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावे शंभर टक्के सौरऊर्जेवर पहा गावांची यादी

Sour Gram : महावितरणची नवी योजना प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावे शंभर टक्के सौरऊर्जेवर पहा गावांची यादी

Sour Gram : New scheme of Mahavitaran two villages in each district on 100 percent solar energy See list of villages | Sour Gram : महावितरणची नवी योजना प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावे शंभर टक्के सौरऊर्जेवर पहा गावांची यादी

Sour Gram : महावितरणची नवी योजना प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावे शंभर टक्के सौरऊर्जेवर पहा गावांची यादी

pm surya ghar yojana महावितरणने प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांना शंभर टक्के सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्याची योजना तयार केली असून निवड झालेल्या गावांना येत्या दोन महिन्यात सौरऊर्जेद्वारे शंभर टक्के वीजपुरवठा करण्यात येणार आहे.

pm surya ghar yojana महावितरणने प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांना शंभर टक्के सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्याची योजना तयार केली असून निवड झालेल्या गावांना येत्या दोन महिन्यात सौरऊर्जेद्वारे शंभर टक्के वीजपुरवठा करण्यात येणार आहे.

पुणे : महावितरणने प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांना शंभर टक्के सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्याची योजना तयार केली असून निवड झालेल्या गावांना येत्या दोन महिन्यात सौरऊर्जेद्वारे शंभर टक्के वीजपुरवठा करण्यात येणार आहे.

या गावांमधील पाणीपुरवठा व दिवाबत्ती सौरऊर्जीकरणासाठी योजनांच्या शासकीय निधीतून पैसे उपलब्ध करण्यात येणार आहेत; तसेच गावातील सर्व वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांना या योजनेत सहभागी होण्यासाठीही आवाहन करण्यात येणार आहे.

पुणे परिमंडळातील शिवतीर्थनगर, निगडीतील सेक्टर २५, तर बारामतीतील वांजरवाडी कुंभारकर वस्ती, गणेश रोड नानगाव यांचा समावेश करण्यात आला आहे. निवड झालेल्या गावांत प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत घरगुती ग्राहकांना ३ किलोवॉटपर्यंत ७८ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निवासी घरगुती ग्राहकांसाठी प्रतिकिलोवॉट ३० हजार रुपये अनुदान दोन किलोवॉटपर्यंत मिळते. तीन किलोवॉटपर्यंत अतिरिक्त एक किलोवॉट क्षमतेसाठी १८ हजार रुपयांचे अनुदान मिळते.

तीन किलोवॉटपेक्षा मोठ्या योजनेसाठी एकूण अनुदान ७८ हजारांपर्यंत मर्यादित आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील आदर्शगाव मन्याचीवाडी येथे लवकरच शंभर टक्के सौरऊर्जेद्वारे विद्युत पुरवठा करण्यात येणार असून हे गाव लवकरच सौरग्राम म्हणून नावलौकिकाला येणार आहे.

शंभर टक्के सौरऊर्जेसाठी निवडलेली गावे
पुणे परिमंडलाअंतर्गत गणेशखिंड मंडळ (शिवतीर्थनगर, सेक्टर २५ निगडी), बारामती मंडळ (यांजरवाडी कुंभारकर वस्ती, गणेश रोड नानगाव), जालना जिल्हा (पातोडा, दारेगाव), बीड जिल्हा (नानदी, आनंदवाडी), लातूर जिल्हा (नवीन आदर्श कॉलनी, मयूरबन सोसायटी), हिंगोली जिल्हा (सुलदळी गोरे, दातेगाव), नांदेड जिल्हा (हाडोळी, दवणगिर), परभणी जिल्हा (आंबेटाकळी. मुरूमखेडा), पेण मंडळ (पाडवी पठार, वडवल), वाशी मंडळ (नेरेपाडा गाव, सिवानसाई गाव), धुळे जिल्हा (कलगाव, नाथे), जळगाव जिल्हा (निबोल, पातोंडी), नंदुरबार जिल्हा (मोहिदा, ब्राह्मणपुरी), कल्याण मंडळ-१ ( शिरवली कुंभारली), कल्याण मंडळ-२ (गोलभान, मोहोप), पालघर जिल्हा (अक्करपट्टी, कोलगाव), वसई मंडळ (शिवनेरी, निर्वाण), रत्नागिरी जिल्हा (फुरुस, असुर्डे), अहमदनगर जिल्हा (पारेगाव, हिवरे बाजार), मालेगाव मंडळ (वाके, निबोळा), नाशिक मंडळ (कोनांबे, दारणा सांगवी), अकोला जिल्हा (सौंदाळा, सांगलुड), बुलढाणा जिल्हा (बजरंग नगर-सागवान एरिया, सावजी लेआउट, सुटाळा खुर्द), वाशिम जिल्हा (झकलवाडी, पारवा), अमरावती जिल्हा (नवाथे, काठोरा), चंद्रपूर जिल्हा (सोमनाथ, आनंदवन), गडचिरोली जिल्हा (कोंढाणा, तुंबडी, मेंढा), भंडारा जिल्हा (भोसा, दहेगाव), नागपूर ग्रामीण मंडळ (चिखली, सिंधी), नागपूर शहर मंडळ (किरमीती भारकस, कॉस्मोपॉलिटन), वर्धा जिल्हा (नागझरी, नेरी मिर्जापूर), सातारा जिल्हा (मन्याची वाडी), सोलापूर जिल्हा (चिंचणी, औज), कोल्हापूर जिल्हा (शेळकेवाडी, पिराचीवाडी), सांगली जिल्हा (झुरेवाडी, निमसोड).

Web Title: Sour Gram : New scheme of Mahavitaran two villages in each district on 100 percent solar energy See list of villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.