अहिल्यानगर : नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना मदतीसाठी महसूल विभागाकडून जाहीर करण्यात येत असलेल्या पैसेवारीचा शासनाकडून आधार घेण्यात येतो.
परंतु ऑगस्ट महिन्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी जाहीर केलेल्या १,६०९ गावांपैकी खरीप हंगामातील ५८७ व रब्बी हंगामातील १,०२२ गावांतील पैसेवारी ५० पैसेपेक्षा जास्त आहे.
यामुळे मदत मिळण्यास अडचणी येण्याची शक्यता असून महसूल विभागाने ३१ ऑक्टोबरला सुधारित पैसेवारी जाहीर केली जाणार असल्याचे सांगितले आहे.
जिल्ह्यात १३ ते २९ सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टी, पुरामुळे खरीप हंगामातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यात काळात १ हजार ३११ गावांतील ८ लाख ३४ हजार ९७० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
अतिवृष्टीने खरीप हंगामातील जवळपास ५० टक्क्यांहून अधिक पिके वाया गेली आहेत. जिल्ह्यात ३३ हजार ३३८ शेतकऱ्यांचे २० हजार ३४ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांच्या आत, तर ८ लाख १६ हजार शेतकऱ्यांचे ५ लाख ५६ हजार ८४५ शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी २०२५-२६ ची खरीप हंगाम गावांची नजरअंदाज पैसेवारी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील १,६०९ गावांतील ५८७ गावे खरीप हंगामाची, तर १,०२२ गावे रब्बी हंगामाची समजली जातात.
महसूल विभागाकडून ऑगस्ट महिन्यात जाहीर झालेल्या पैसेवारीत जिल्ह्यातील ५८७गावांची खरीप पैसेवारी ५० पैसे पेक्षा जास्त जाहीर करण्यात आली आहे. यामुळे अतिवृष्टी, पुराने बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर होणाऱ्या सुधारित पैसेवारीकडे लक्ष लागले आहे.
अंतिम आणेवारीकडून अपेक्षा
ही नजरअंदाज आणेवारी आहे. १५ ऑगस्टला प्रकाशित झाल्याने यात संपूर्ण नोंदी आलेल्या नाहीत. मात्र, जिल्हा प्रशासन अंतिम आणेवारीमध्ये जिल्ह्यातील शेतमालाच्या नुकसानीची योग्य नोंद घेतील, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
शेतकऱ्यांची नाराजी
जाहीर झालेल्या नजरअंदाज पैसेवारीवर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची नोंद घेतली गेली नसल्याचे अंतिम आणेवारीकडून अपेक्षा अनेकांचे मत आहे.
अधिक वाचा: उसाच्या एफआरपी वाढीशी साखर-इथेनॉल दर लिंक केले जाणार; लवकरच प्रस्ताव केंद्र शासनाकडे