राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राज्यात ठराविक भागासाठी सुरू करण्यात आली.
ही योजना आता संपूर्ण राज्यभर सुरू केली आहे. या योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचनास पूरक अनुदानाबरोबरच, वैयक्तिक शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, हरितगृह उभारणे व शेडनेट हाऊस उभारण्यासाठी अनुदान वितरित करण्यात येत आहे.
वित्त विभागामार्फत मंजूर
वर्ष २०२४-२५ मधील वित्त विभागामार्फत मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीच्या मर्यादेत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या ४०० कोटींच्या (सूक्ष्म सिंचनाकरिता पूरक अनुदान घटकासाठी ३०० कोटी व वैयक्तिक शेततळे घटकासाठी १०० कोटी कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
अर्थसंकल्पीय प्रणालीवर वितरण
१) वर्ष २०२४-२५ या वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकाकरिता ५२९.५० लक्ष (रुपये पाच कोटी एकोणतीस लाख पन्नास हजार मात्र) निधी आयुक्त (कृषी) यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात येत आहेत.
२) लाभार्थ्यांना अनुदान अदागयीची कार्यवाही महा-डीबीटी प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे आणि लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदानाची रक्कम सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा केली जाणार आहे.
५२९ लक्ष निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. कृषी आयुक्तालयाकडून प्राप्त मागणी व सद्यःस्थितीत असलेल्या प्रलंबित दायित्वाच्या अनुषंगाने योजनेत तरतूद केली आहे.
अधिक वाचा: Jaltara : मनरेगातुन जलतारा खड्डा कसा आणि कुठे काढावा? किती मिळतंय अनुदान? वाचा सविस्तर