Rural Postal Scheme : आजकाल बाजारात अनेक महागडे हेल्थ इन्शुरन्स पाहायला मिळतात. म्हणूनच ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी विमा काढण्याच्या भानगडीत पडत नाहीत. पण पोस्टाची एक जीवन विमा योजना आहे, जी केवळ २५ रुपयांत मिळते आहे.
जवळपास १९९५ मध्ये ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स (RPLI) सुरू आहे. या योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट विशेषतः असुरक्षित गटांना, महिला कामगारांना आणि ग्रामीण भागातील कुटुंबांना जीवन विमा संरक्षण देणे.
फक्त २५ रुपयांत विमा
विम्याची रक्कम खूपच लवचिक आहे, ती १० हजार ते १० लाख रुपयांपर्यंत आहे. कोणताही ग्रामीण भागातील मजूर, शेतकरी याचा लाभ घेऊ शकते. शिवाय, कुटुंबातील इतर सदस्यांसाठी पॉलिसी मिळवणे देखील खूप सोपे आहे. टपाल विभागाद्वारे चालवल्या जाणाऱ्या या विमा पॉलिसींपैकी सर्वात लोकप्रिय म्हणजे १५ आणि २० वर्षांच्या मुदतीच्या योजना. या योजनांसाठी प्रीमियम ५ हजार रुपयांच्या विमा रकमेसाठी सुमारे २५ रुपयांपासून सुरू होतो.
या योजनेत विविध योजना
या पोस्टल योजनेंतर्गत ग्रामीण अंत्योदय योजना, ग्राम सुरक्षा योजना, बाल जीवन विमा, ग्राम सुमंगल आणि ग्राम सुविधा अशा विविध योजना देते. यापैकी काही योजना केवळ संरक्षण देतात, तर काही गुंतवणूक फायदे देखील देतात. बाल जीवन विमा योजना मुलांची सुरक्षितता सुनिश्चित करणे, कठीण काळातही त्यांचे शिक्षण आणि भविष्य प्रभावित होणार नाही याची खात्री करणे हे उद्दिष्ट ठेवते.
इथे संपर्क करा
जर तुम्हाला ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजनेत सहभागी व्हायचं असल्यास जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये भेट देऊ शकता. या ठिकाणी आपल्याला या योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली जाईल. एवढ्या कमी पैशांत मिळणारा हा विमा फायदेशीर असल्याचे दिसून येते.
