Lokmat Agro >शेतशिवार > शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविणाऱ्या राज्यातील 'या' २८ साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाई

शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविणाऱ्या राज्यातील 'या' २८ साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाई

RRC takes action against 'these' 28 sugar factories in the state for evading farmers sugarcane payments | शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविणाऱ्या राज्यातील 'या' २८ साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाई

शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविणाऱ्या राज्यातील 'या' २८ साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाई

Sugarcane FRP शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविणाऱ्या राज्यातील २८ साखर कारखान्यांवर साखर आयुक्तांनी आरआरसी कारवाई केली आहे.

Sugarcane FRP शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविणाऱ्या राज्यातील २८ साखर कारखान्यांवर साखर आयुक्तांनी आरआरसी कारवाई केली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

सोलापूर : शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविणाऱ्या राज्यातील २८ साखर कारखान्यांवर साखर आयुक्तांनी आरआरसी कारवाई केली असून त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील तब्बल १५ साखर कारखानदार आहेत.

एक महिन्यावर साखर हंगाम येऊन ठेपला असताना आजही मागील हंगामातील राज्यातील ५४ कारखानदारांनी शेतकऱ्यांना ३०४ कोटींना लटकावले आहे.

बोटावर मोजण्याइतकेच साखर कारखाने उसाला चांगला दर देतात व उसाचे पैसे शेतकऱ्यांना वेळेवर देतात. इतर बहुतेक साखर कारखानदार शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर व वेळेआधी तोडणी करतात.

मात्र, तोडणी केलेल्या उसाचे पैसे देत नाहीत. शेतकरी साखर कारखानदारांच्या दारात, साखर कारखान्यांवर तसेच अधिकाऱ्यांकडे चकरा मारतात. मात्र, साखर कारखानदारांना वेदना होत नाहीत.

शेतकऱ्यांच्या हातात त्रागा करण्यापलीकडे काहीच नाही. मागील हंगामात गाळप घेतलेल्या दोनशेपैकी ५४ साखर कारखानदारांनी एफआरपीप्रमाणे ३०४ कोटी रुपये अद्यापही दिले नाहीत.

केवळ मागील हंगामात एफआरपी न देणाऱ्या राज्यातील २८ साखर कारखान्यांची साखर आयुक्तांनी आरआरसी केली आहे. या अठ्ठावीसमध्ये सोलापूर जिल्ह्यातील १५ व सोलापूर प्रादेशिक विभागातील धाराशिव जिल्ह्यातील एका साखर कारखान्यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आजही ४२ कोटी थकीत..
◼️ सोलापूर जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांकडे एफआरपीप्रमाणे ४२ कोटी १६ लाख रुपये थकले आहेत.
◼️ सिद्धेश्वर सोलापूर सर्वाधिक १८ कोटी तर भीमा सहकारी टाकळी सिकंदर, गोकुळ शुगर, जयहिंद शुगर आचेगाव, सहकार शिरोमणी वसंतराव काळे, मातोश्री लक्ष्मी शुगर, इंद्रेश्वर शुगर, सिद्धनाथ शुगर तिर्हे या आठ साखर कारखान्यांकडे ऑगस्ट अखेरपर्यंत ४२ कोटी १६ लाख रुपये थकबाकी आहे. धाराशिव जिल्ह्यातील एकही कारखाना थकीत नाही.

'आरआरसी' कारवाई झालेले कारखाने
१) मातोश्री लक्ष्मी शुगर, अक्कलकोट
२) गोकुळ शुगर धोत्री
३) लोकमंगल, बीबीदारफळ
४) लोकमंगल, भंडारकवठे
५) जय हिंद शुगर, आचेगाव
६) श्री संत दामाजी, मंगळवेढा
७) सिद्धनाथ शुगर, तिर्हे
८) इंद्रेश्वर शुगर, बार्शी
९) धाराशिव शुगर, सांगोला
१०) सहकार शिरोमणी वसंतराव काळे, पंढरपूर
११) सिद्धेश्वर, सोलापूर
१२) अवताडे शुगर, मंगळवेढा
१३) भैरवनाथ शुगर, आलेगाव
१४) भैरवनाथ शुगर, लवंगी
१५) भीमा सहकारी
१६) भीमाशंकर, वाशी (धाराशिव)
१७) स्वामी समर्थ शुगर, नेवासा
१८) गजानन महाराज शुगर, संगमनेर
१९) गंगामाई इंडस्ट्रीज, शेवगाव
२०) केदारेश्वर सहकारी, शेवगाव
२१) खंडाळा तालुका शेतकरी साखर कारखाना, सातारा
२२) किसनवीर सातारा सहकारी
२३) सचिन घायाळ शुगर छत्रपती, संभाजीनगर
२४) जय महेश माजलगाव, बीड
२५) कर्मयोगी शंकरराव पाटील, इंदापूर
२६) समृद्धी शुगर, घनसांगवी
२७) डेक्कन शुगर, यवतमाळ
२८) पैनगंगा साखर कारखाना, बुलढाणा

अधिक वाचा: आता पीएम किसानचा हप्ता मिळणार फक्त शेतकऱ्याच्या पत्नीला; काय आहे निर्णय? वाचा सविस्तर

Web Title: RRC takes action against 'these' 28 sugar factories in the state for evading farmers sugarcane payments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.