Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > यंदा नारळाच्या उत्पादनात मोठी घट कशामुळे झाली वाचा सविस्तर

यंदा नारळाच्या उत्पादनात मोठी घट कशामुळे झाली वाचा सविस्तर

Read in detail what caused the huge decline in coconut production this year | यंदा नारळाच्या उत्पादनात मोठी घट कशामुळे झाली वाचा सविस्तर

यंदा नारळाच्या उत्पादनात मोठी घट कशामुळे झाली वाचा सविस्तर

भात पिकासह मुरुड तालुक्यात नारळ व सुपारी हे प्रमुख पीक घेतले जाते. मात्र हवामान बदलाचा फटका यंदाही नारळ पिकाला बसला आहे. उत्पादनात मोठी घट झाली आहे.

भात पिकासह मुरुड तालुक्यात नारळ व सुपारी हे प्रमुख पीक घेतले जाते. मात्र हवामान बदलाचा फटका यंदाही नारळ पिकाला बसला आहे. उत्पादनात मोठी घट झाली आहे.

गणेश चोडणेकर
आगरदांडा : भात पिकासह मुरुड तालुक्यात नारळ व सुपारी हे प्रमुख पीक घेतले जाते. मात्र हवामान बदलाचा फटका यंदाही नारळ पिकाला बसला आहे. उत्पादनात मोठी घट झाली आहे.

येथून बाजारात आठवड्याला सात ते आठ ट्रक माल जात होता. हे प्रमाण चार ते पाच ट्रकवर आले आहे. निसर्ग सानिध्य लाभलेल्या मुरुड तालुक्यातही नारळ व सुपारी पिकाला वातावरण आहे.

मात्र या कल्पवृक्षाला गेल्या काही वर्षांपासून अस्मानी संकटांची दृष्ट लागली आहे. उत्पादनात सातत्याने घट होत असल्याने बागायतदारांचे म्हणणे आहे.

चक्रीवादळातून अजूनही बागा सावरल्या नाहीत
मुरुड तालुक्यासह नांदगाव, मजगाव, आगरदांडा, मांडला, भोईवर, सर्वे-चिकणी, काशिद, बोर्ली व अन्य अनेक गावागावातून नारळाचे उत्पादन घेतले जाते. मात्र २०२० मध्ये निसर्ग चक्रीवादळात तालुक्यातील ७७ हेक्टर क्षेत्र बाधीत झाले होते. तेंव्हापासून उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.

उत्पादन का घटले?
१) नाराळच्या झाडाचा कोवळा कोंब कुजून त्यात अव्या पडत आहेत.
२) झाडांच्या पानांवर करपा रोग पडून झाप करपणे, झापावर मर रोग, गेंड्या भुंग्याने झाडाचा गर शोषून घेणे, पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढल्याने झाडांच्या पानांवर पांढरी बुरशी आदी रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे झाडांचे अन्नरस तयार होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
३) साधारण ८० ते १०० फळे एका माडापासून पुरेसे पाणी व खत दिले तर मिळतात. मात्र सध्या हे प्रमाण निम्म्यावर आले आहे.

४३५ हेक्टरवर नारळ तर ४१६ हेक्टरवर सुपारी
मुरुड तालुक्यातील एकूण बागायत क्षेत्रापैकी ४३५ हेक्टर क्षेत्रावर नारळ पिकाची तर ४१६ हेक्टर सुपारी लागवड केली होती. श्रीवर्धन रोठा ह्या ब्रँडच्या सुपारीला मोठी मागणी आहे.

नारळ पिकावर बुरशी रोग हा सप्टेंबर, ऑक्टोबरपासून आहे. झापाची मागची बाजू पांढरी पडत असून पानांच्या दर्शनी भागावर काजळी पसरली आहे. बुरशी प्रतिबंधक फवारणी लहान झाडांवर शक्य आहे. मात्रण उंच माडांवर फवारणी शक्य नसल्याने उत्पादन घटेल आहे. - सुलभा जाधव, बागायतदार, शिघे

Web Title: Read in detail what caused the huge decline in coconut production this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.