सोलापूर : मे महिन्यातील पूर्व मोसमी पावसाने झालेल्या २२ हजार हेक्टर क्षेत्रातील पीक नुकसानीचे ४० कोटी ४४ लाख रुपये शासनाकडून आले.
आता ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. करमाळा व माढा तालुक्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.
यंदा मे महिन्यात जिल्हात एकूण २३३ मि.मी. इतका पाऊस पडल्याने जिल्ह्यातील शेती पिकांचे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे करण्यात आले होते.
जिल्ह्यात २१ हजार ९८९ शेतकऱ्यांच्या ३२ हजार ४४० हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते. त्याची नुकसान रक्कम ४० कोटी ४३ लाख ४६ हजार रुपये शासनाकडे मागणी केली होती.
ही रक्कम आली शासनाकडून असून, जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसील कार्यालयाला वितरीत करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
कोणत्या तालुक्याला किती?
मंगळवेढा तालुक्यात ४३ शेतकऱ्यांची पाच लाख
अक्कलकोट तालुक्यात १४८ शेतकऱ्यांचे १७ लाख
सांगोला तालुक्याची १०२ शेतकऱ्यांची १८ लाख
पंढरपूर तालुक्यात ५७४ शेतकऱ्यांचे ६५ लाख
दक्षिण सोलापूर तालुक्यात ६७५ शेतकऱ्यांचे ९३ लाख
उत्तर तालुक्यात २१८९ शेतकऱ्यांचे एक कोटी ७६ लाख
मोहोळ तालुक्यात १४३१ शेतकऱ्यांचे एक कोटी ७९ लाख
बार्शी तालुक्यात पाच हजार १३८ शेतकऱ्यांचे तीन कोटी १७ लाख
माळशिरस तालुक्यात तीन हजार १७३ शेतकऱ्यांचे तीन कोटी ४२ लाख
माढा तालुक्यात दहा हजार १४७ शेतकऱ्यांचे १३ कोटी ७८ लाख
करमाळा तालुक्यात आठ हजार ८३० शेतकऱ्यांची १४ कोटी ५५ लाख रुपये शासनाकडून आले आहेत.
केळीचे झाले होते अधिक नुकसान
◼️ जिरायत क्षेत्रातील ३५६१ शेतकऱ्यांच्या १५७० हेक्टर क्षेत्रासाठी एक कोटी ३३ लाख ४२ हजार रुपये, बागायती क्षेत्रातील १९ हजार २७१ शेतकऱ्यांच्या १२ हजार ४४२ हेक्टर क्षेत्रासाठी २१ कोटी १५ लाख, तर फळबागा बाधित ९ हजार ६०८ शेतकऱ्यांच्या ७ हजार ९७७ हेक्टरसाठी १७ कोटी २५ लाख रुपये, याप्रमाणे पीक नुकसानभरपाईसाठी शासनाकडे निधी मागणी केला आहे.
◼️ केळी ५२५३ हेक्टर, मका १६९६ हे., भाजीपाला १४७० हे., डाळिंब ११७० हेक्टर, भुईमूग ७०२ हे., आंबा ४८० हे., पपई ४५१ हे. आदी नुकसान क्षेत्र.
अधिक वाचा: e Pik Pahani : आता पिक पाहणी होणार झटपट; वापरा अपडेटेड व्हर्जनचे 'हे' मोबाईल अॅप