करमाळा : अवकाळी पाऊस, वादळी वारा, अतिवृष्टी या संकटावर मात करत शेटफळच्या नवनाथ पोळ या प्रयोगशील तरुण शेतकऱ्याने परिश्रम घेत चार एकर क्षेत्रावर निर्यातक्षम केळीचे भरघोस उत्पादन घेतले आहे.
केळीचा दर्जा उत्तम ठेवण्यात यश आल्याने २७ रुपये प्रति किलोचा दर मिळवून चार एकर क्षेत्रामध्ये त्यास ३२ लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे.
करमाळा तालुक्यातील उजनी धरण घाटातील काठावरील शेतकरी पारंपरिक ऊस शेती सोडून मोठ्या प्रमाणावर केळी पिकाकडे वळाला आहे.
अनुकूल वातावरण आधुनिक तंत्राचा वापर करून निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेत आहे. गेल्या चार-पाच वर्षापासून केळीला मिळणारा चांगला दर यामुळे प्रतिवर्षी केळी पिकाखालील क्षेत्रामध्ये वाढ होत आहे.
दरम्यान वारंवार बदलते हवामान अवकाळी पाऊस, वादळी वारे, करपा, मच्छर, स्पॉट, यामुळे उत्पादनावर व पिकाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ लागला आहे.
गेल्या काही दिवसांपासून आशा केळीला दर फारच कमी मिळत असल्याचा फटका केळी उत्पादकांना होत आहे. तरीही काही शेतकरी जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर उत्पादन घेत आहेत.
पदवीधरचे शिक्षण अन् शेतात श्रम..
◼️ शेटफळ (ता. करमाळा) येथील नवनाथ पोळ पदवीधर असून त्यांनी आपल्या चार एकर शेतामध्ये जी नाईन वाणाच्या केळीची डिसेंबर २०२४ मध्ये जोड ओळ पद्धतीने ९ फूट अंतरावर केळी लागवड केली.
◼️ सुरुवातीपासूनच व्यवस्थित खत व पाण्याचे व्यवस्थापन केल्याने दर्जेदार निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेण्यास ते यशस्वी झाले असून गुणवत्ता पूर्ण केळीमुळे २७ ते २९ रुपये प्रतिकिलो दर मिळाला आहे.
◼️ त्यांच्या चार एक क्षेत्रामध्ये साधारण १२० टन उत्पादन मिळणार असून त्यापासून ३० ते ३५ लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.
अधिक वाचा: आता खरेदीखतापूर्वीच जमिनीची हद्द कायम होणार; काय आहे निर्णय? जाणून घ्या सविस्तर