Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > रेशन दुकानातून गव्हासोबत मिळणार आता मका; कोणत्या लाभार्थ्यांना किती किलो मका मिळणार?

रेशन दुकानातून गव्हासोबत मिळणार आता मका; कोणत्या लाभार्थ्यांना किती किलो मका मिळणार?

Now you will get maize along with wheat from ration shops; How much maize will which beneficiaries get? | रेशन दुकानातून गव्हासोबत मिळणार आता मका; कोणत्या लाभार्थ्यांना किती किलो मका मिळणार?

रेशन दुकानातून गव्हासोबत मिळणार आता मका; कोणत्या लाभार्थ्यांना किती किलो मका मिळणार?

ration maka vatap राज्य शासनाकडून अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना गहू, तांदळाचे नियमित वाटप केले जाते.

ration maka vatap राज्य शासनाकडून अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना गहू, तांदळाचे नियमित वाटप केले जाते.

अहिल्यानगर : राज्य शासनाकडून अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना गहू, तांदळाचे नियमित वाटप केले जाते.

परंतु मार्च महिन्यापासून रेशनकार्डधारकांना स्वस्त धान्य तांदळाऐवजी गव्हासोबत मिळणार आहे. दुकानातून मका जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यात आठ केंद्रवर मका खरेदी करण्यात येत आहे.

ही खरेदी केलेली मका रेशनदुकानातून लाभार्थ्यांना दिली जाणार आहे आतापर्यंत १५ हजार क्विंटल मका खरेदी करण्यात असून २८ फेब्रुवारीपर्यंत खरेदी सुरू राहाणार आहे.

खरेदी करण्यात आलेली संपूर्ण मका लाभार्थ्यांना दिली जाणार असल्याने पुढील तीन महिने रेशनवर गव्हासोबत मका मिळण्याची शक्यता आहे.

अंत्योदय योजनेतील कुटुंबांना १० किलो मका व ११ किलो गहू मिळणार आहे. तर प्राध्यान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन किलो गहू व एक किलो मका दिली जाणार आहे.

जिल्ह्यात अंत्योदय योजनेचे ८७हजार ६४ कार्डधारक आहेत, तर ३ लाख ८६ हजार ३४ लाभार्थी आहेत. प्राधान्य कुटुंब योजनेचे ६ लाख ३७ हजार ११४ रेशनकार्डधारक आहेत, तर २५ लाख ६३ हजार ९७१ लाभार्थी आहेत.

मकाचे काय करायचे?
◼️ शासनाकडून रेशनदुकानातून गहू, तांदळांचे नियमित वाटप केले जाते.
◼️ काही वेळा ज्वारी, साखर, तेल व डाळ दिले जाते.
◼️ मधल्या काळात आनंदाचा शिधा, साड्या देखील वाटण्यात आल्या.
◼️ परंतु यावेळी गव्हासोबत मका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
◼️ आता लाभार्थ्यांना या मकाचे काय करावे असा प्रश्न पडणार आहे.

८ केंद्रावर मका खरेदी
जिल्ह्यात नगर, घारगाव, श्रीगोंदा, घोगरगाव, मिरजगाव, शेवगाव, पाथर्डी व कोपरगाव येथील फेडरेशन केंद्रावर मका खरेदी केली जात आहे. तर जामखेड व संगमनेर येथील केंद्रावर शेतकऱ्यांची नोंदणी झालेली नाही.

दक्षता पथक स्थापन
फेडरेशन केंद्रावर शेतकऱ्यांकडून मका खरेदी करण्यात येत आहे. संबंधित तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखालील दक्षता पथकाला फेडरेशन केंद्राच्या तपासणीचे अधिकार देण्यात आले आहेत. गैरप्रकार आढळून आल्यास कारवाई केली जाणार आहे.

अधिक वाचा: उपग्रहाने केला भंडाफोड; जळगाव जिल्ह्यात केळी पिकासाठी २१६ कोटींचा विमा लाटण्याचा डाव उघड

Web Title : राशन की दुकानों पर गेहूं के साथ अब मक्का भी मिलेगा: विवरण यहाँ

Web Summary : अहिल्यानगर में राशन कार्ड धारकों को मार्च से राशन की दुकानों पर गेहूं के साथ मक्का भी मिलेगा। अंत्योदय परिवारों को 10 किलो मक्का, 11 किलो गेहूं; प्राथमिकता वाले परिवारों को 1 किलो मक्का, 2 किलो गेहूं मिलेगा। पंद्रह हजार क्विंटल मक्का खरीदा गया है।

Web Title : Corn Now Available with Wheat at Ration Shops: Details Here

Web Summary : Ration card holders in Ahilyanagar will receive corn along with wheat from ration shops starting in March. Antyodaya families get 10 kg corn, 11 kg wheat; priority families get 1 kg corn, 2 kg wheat. Fifteen thousand quintals of corn have been purchased.