आता तुमचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड एक्सपायर झाले किंवा बदलले तरी, त्यावर सेट केलेले तुमचे ऑटोमॅटिक पेमेंट (ई-मॅडेट्स) बंद होणार नाही. हे पेमेंट आपोआप तुमच्या नवीन कार्डवर ट्रान्स्फर केले जाईल.
शिवाय दरमहा होणाऱ्या १५,००० रुपयांपर्यंतच्या ऑटोमॅटिक पेमेंटसाठी आता ग्राहकांना वारंवार ओटीपी किंवा पासवर्ड टाकण्याची गरज भासणार नाही, असे आरबीआयने म्हटले आहे.
डिजिटल व्यवहारांना अधिक सुलभ आणि ग्राहकांसाठी सोयीस्कर बनवण्यासाठी आरबीआयने नवे नियम आणले आहेत.
ई-मँडेट्स आपोआप शिफ्ट
◼️ जुने कार्ड हरवल्यास नवीन कार्ड घ्यावे लागते.
◼️ अशा वेळी ओटीटी सबस्क्रिप्शन, वीज बिल वा इतर मासिक देयकांसाठी पुन्हा नोंदणी करावी लागते.
◼️ मात्र, आरबीआयच्या नवीन नियमांनुसार, जुन्या कार्डवरील सर्व ई-मँडेट्स आता नवीन कार्डवर आपोआप शिफ्ट होतील.
चुकीचे ट्रान्झेंक्शन झाले
◼️ जर ग्राहकाच्या संमतीशिवाय किंवा चुकीचे ट्रान्झेंक्शन झाले, तर त्यासाठी आरबीआयचे विद्यमान नियम लागू राहतील.
◼️ ग्राहकाची जबाबदारी निश्चित केली जाईल, असे आरबीआयने बँकांना सांगितले आहे.
◼️ या निर्णयामुळे कार्डधारकांना दिलासा मिळणार आहे.
१ लाख मर्यादा कुणासाठी?
◼️ १ लाख रुपयांपर्यंतची मर्यादा म्युच्युअल फंड (एसआयपी), विमा प्रीमियम आणि क्रेडिट कार्ड बिलांच्या पेमेंटसाठी करण्यात आली आहे.
◼️ म्हणजेच १ लाखापर्यंतच्या अशा व्यवहारांना ओटीपीशिवाय परवानगी असेल.
◼️ पैसे कापले जाण्यापूर्वी २४ तास आधी बँकेला ग्राहकाला नोटिफिकेशन पाठवावे लागेल.
अधिक वाचा: एप्रिल ते सप्टेंबर महिन्याच्या लाईट बिलात अजून १५ टक्के सवलत; वाचा कुणाला मिळणार लाभ?
