lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > नमो शेततळे अभियान; राज्यात ७३०० शेततळे उभारण्यास मान्यता

नमो शेततळे अभियान; राज्यात ७३०० शेततळे उभारण्यास मान्यता

namo shettale abhiyan; Approval to set up 7300 farm pond in the state | नमो शेततळे अभियान; राज्यात ७३०० शेततळे उभारण्यास मान्यता

नमो शेततळे अभियान; राज्यात ७३०० शेततळे उभारण्यास मान्यता

राज्यातील ८२% शेती ही कोरडवाहू असून ती सर्वस्वी पावसावर अवलंबून आहे. राज्याच्या विविध भागात पावसाचे होणारे असमान वितरण आणि ...

राज्यातील ८२% शेती ही कोरडवाहू असून ती सर्वस्वी पावसावर अवलंबून आहे. राज्याच्या विविध भागात पावसाचे होणारे असमान वितरण आणि ...

शेअर :

Join us
Join usNext

राज्यातील ८२% शेती ही कोरडवाहू असून ती सर्वस्वी पावसावर अवलंबून आहे. राज्याच्या विविध भागात पावसाचे होणारे असमान वितरण आणि पावसामध्ये येणारे मोठे खंड (Dry Spells) या प्रमुख नैसर्गिक अडचणींवर मात करण्यासाठी शेतावर शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा उभी करुन पाण्याची साठवणूक करण्याचा उपाय करण्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढावे यासाठी पाण्याची साठवणूक वाढविणे करिता त्याचप्रमाणे शेतीला पूरक मत्स्य व्यवसायासारखे शेती संलग्न व्यवसाय उभारता यावे याकरिता शेतावर शेत तळ्यासारखी पायाभूत सुविधा उभी करण्यास चालना देण्याच्या अनुषंगाने मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात राबविण्यात येत असलेल्या नमो ११ सुत्री कार्यक्रमांतर्गत “नमो शेततळे अभियान” राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. 

संदर्भात शासन निर्णय:
-
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या नमो ११ सुत्री कार्यक्रमांतगर्त राज्यात “नमो शेततळे अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत राज्यात ७३०० शेततळे उभारण्यात येईल.
- छत्रपती शिवाजी महाराज कृषि योजनेच्या मागेल त्याला शेततळे magel tyala shettale या घटकांतर्गत उभारण्यात येणाऱ्या शेततळयांचा समावेश सदर अभियानांतर्गत उभारण्यात येणाऱ्या शेततळयांमध्ये करण्यात येईल.
- छत्रपती शिवाजी महाराज कृषि योजनेंतर्गत मागेल त्याला शेततळे या घटकाकरिता उपलब्ध निधीतुन नमो शेततळे अभियान राबविण्यात यावे.
- सदर अभियानाच्या अंमलबजावणी करिता छत्रपती शिवाजी महाराज कृषि योजनेच्या निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना कायम राहतील.

Web Title: namo shettale abhiyan; Approval to set up 7300 farm pond in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.