Lokmat Agro >शेतशिवार > गवत उगवणाऱ्या माळावर वयाच्या ७८ व्या वर्षी मोतीराम गुरुजींनी फुलवली शेती

गवत उगवणाऱ्या माळावर वयाच्या ७८ व्या वर्षी मोतीराम गुरुजींनी फुलवली शेती

Motiram Guruji flourished agriculture at the age of 78 on a grass growing barren land | गवत उगवणाऱ्या माळावर वयाच्या ७८ व्या वर्षी मोतीराम गुरुजींनी फुलवली शेती

गवत उगवणाऱ्या माळावर वयाच्या ७८ व्या वर्षी मोतीराम गुरुजींनी फुलवली शेती

मोतीराम पाटील हे टाळगाव (ता. कराड) हे गावचे आहेत. त्यांनी कुसळाशिवाय काहिच न उगवणाऱ्या पाचगणी येथील सात एकर जमीन खरेदी केली.

मोतीराम पाटील हे टाळगाव (ता. कराड) हे गावचे आहेत. त्यांनी कुसळाशिवाय काहिच न उगवणाऱ्या पाचगणी येथील सात एकर जमीन खरेदी केली.

शेअर :

Join us
Join usNext

शिवाजी पाटील
कोकरूड : फक्त गवत उगवणाऱ्या आणि पवनचक्कीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या गुढे पाचगणी पठारावर निवृत्त शिक्षक मोतीराम गणपती पाटील यांनी विविध पिकांच्या शेतीसह औषधी वनस्पतीची उत्पादने घेत शेतकऱ्याच्या समोर आदर्श निर्माण केला आहे.

मोतीराम पाटील हे टाळगाव (ता. कराड) हे गावचे आहेत. त्यांनी कुसळाशिवाय काहिच न उगवणाऱ्या पाचगणी येथील सात एकर जमीन खरेदी केली. तेथे पहिल्या वर्षी भात पिकाचा चांगला उतारा मिळाला.

पुढे इंद्रायणी भातपीक घेतले. पिकांसाठी बोअरवेल घेतली. त्यांनतर वीज घेतली व पुन्हा २०२० मध्ये सौरऊर्जा प्रकल्प तयार केला. त्यांनी सात एकरांत ऊस घेतला.

पुढे २०२० मध्ये त्यांनी जिरेनियम या औषधी वनस्पतीची लागवड केली. याला किलोला १२ हजार ५०० रुपये दर मिळाला होता. नंतर भात, भुईमूग, शेवगा, लिंबू, आले आदींचे उत्पादन घेतले.

गेल्या वर्षी आले पिकाने एकरी तीन लाख उत्पन्न दिले. ५० गुंठ्यांमध्ये ७० क्विंटल भाताचे उत्पन्न मिळाले. चालू वर्षी दोन एकर उसासोबत दोन एकर शेवगा लावला आहे.

सर्व प्रकारच्या रोगावर असणाऱ्या चिया सीड या औषधी वनस्पतीची लागवड केली. येथे त्यांनी हिमतीने बागायत शेती फुलवली आहे.

निवृत्त गुरुजी रमलेत शेतीत
-
मोतीराम पाटील वयाच्या ७८ व्या वर्षी दररोज टाळगाव ते पाचगणी असा ३२ किलोमीटर प्रवास करत मजुरांच्या मदतीने शेती करीत आहेत.
- त्यांचा मुलगा, मुलगी नोकरीत मोठ्या पदावर कार्यरत आहे. शेतीबरोबरच त्यांनी पाचगणी येथे मधमाशा पालन केले आहे. त्याचेही चांगले उत्पन्न घेतात.
- पठारावर एकमेव हिरव्या पिकांचे क्षेत्र असूनही राखणी आणि सभोवताली कुंपण असल्याने काही धोका नाही.

अधिक वाचा: गुळ व आधारित उत्पादनातून वाढविला शेतीचा गोडवा; खर्च वजा जाता पावणेतीन लाख रुपयांचा फायदा

Web Title: Motiram Guruji flourished agriculture at the age of 78 on a grass growing barren land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.