Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > बाजारपेठ मागणी मात्र लागवडीकडे दुर्लक्ष; रामफळाच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा

बाजारपेठ मागणी मात्र लागवडीकडे दुर्लक्ष; रामफळाच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा

Market demand but cultivation ignored; Farmers should take initiative for Ramphal production | बाजारपेठ मागणी मात्र लागवडीकडे दुर्लक्ष; रामफळाच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा

बाजारपेठ मागणी मात्र लागवडीकडे दुर्लक्ष; रामफळाच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा

सध्या बाजारात रामफळाला १०० ते १२० रुपये प्रतिकिलो असा दर मिळत असून, एका किलोमध्ये दोन ते तीन फळे मिळत आहेत. व्यापाऱ्यांच्या मते, रामनवमीपर्यंत या फळाच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

सध्या बाजारात रामफळाला १०० ते १२० रुपये प्रतिकिलो असा दर मिळत असून, एका किलोमध्ये दोन ते तीन फळे मिळत आहेत. व्यापाऱ्यांच्या मते, रामनवमीपर्यंत या फळाच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

बाळासाहेब गणोरकर 

होळी सण तोंडावर असताना रामनवमी व हनुमान जयंतीचे दिवसही जवळ आले आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक बाजारात रामफळाची आवक सुरू झाली असून, ग्राहकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

इतर फळांसोबत रामफळानेही बाजारपेठेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. रामनवमीच्या दिवशी मंदिरात प्रभू रामांच्या मूर्तीसमोर रामफळ अर्पण करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आहे.

यंदा मात्र पूजाअर्चेसह चवीमुळेही ग्राहक रामफळ आवर्जून खरेदी करताना दिसत आहेत. हृदयासारखा आकार, पिवळट-लालसर रंगछटा आणि गोडसर चव ही रामफळाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

सध्या बाजारात रामफळाला १०० ते १२० रुपये प्रतिकिलो असा दर मिळत असून, एका किलोमध्ये दोन ते तीन फळे मिळत आहेत. व्यापाऱ्यांच्या मते, रामनवमीपर्यंत या फळाच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

वर्षभर उपलब्ध नाही; तरी मागणी कायम

रामफळ हे सीताफळाच्या जातीतील फळ असले तरी वर्षभर बाजारात उपलब्ध नसते. पूजाविधीत इतर फळांइतके स्थान नसतानाही त्याची मागणी हळूहळू वाढताना दिसते. शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध लागवड केल्यास या फळाला चांगली बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते, असे कृषितज्ज्ञांचे मत आहे.

पोषणमूल्यांचा खजिना

आहारतज्ज्ञांच्या मते रामफळात 'सी' जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते. याशिवाय कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम यांसारखी पोषकतत्त्वेही मिळतात. दाहक-विरोधी गुणधर्मामुळे सांधेदुखी व सूज कमी करण्यास मदत होते.

कमी पाण्यात तग धरणारे झाड

• रामफळाची पाने विषारी असल्याने शेळी, गायी, म्हैस यांसारखे प्राणी ती खात नाहीत.

• त्यामुळे बागेचे संरक्षण तुलनेने सोपे होते.

• उन्हाळ्यात या झाडाला विशेष पाण्याची गरज नसते.

• फेब्रुवारीपासून पानगळ सुरू होते; मार्च ते जूनदरम्यान पाणी न दिले तरी झाड तग धरते. 

• साधारण सात वर्षाच्या झाडापासून दरवर्षी १०० ते १५० फळे मिळतात.

• एका झाडापासून सरासरी २५ किलो उत्पादन होते आणि जवळपास एक हजार रुपयांचे उत्पन्न मिळू शकते.

हेही वाचा : एक एकर दोडका ठरला पारंपरिक शेतीच्या तुलनेत लाख फायद्याचा; वाचा प्रकाशरावांची यशकथा

Web Title : रामफल की मांग अधिक, खेती पर ध्यान नहीं; किसानों को पहल करनी चाहिए।

Web Summary : त्योहारों के दौरान रामफल की मांग बढ़ी, ₹100-120/kg मिल रहा है। सीमित उपलब्धता के बावजूद, स्वाद और पोषण मूल्य के कारण लोकप्रियता बढ़ रही है। विशेषज्ञों का सुझाव है कि किसान बेहतर बाजार पहुंच के लिए इसकी खेती करें, इसकी सूखा प्रतिरोधक क्षमता और अच्छे रिटर्न की संभावना को देखते हुए।

Web Title : High Ramphal demand, neglected cultivation; farmers should take initiative.

Web Summary : Ramphal demand surges during festivals, fetching ₹100-120/kg. Despite limited availability, its popularity grows due to taste and nutritional value. Experts suggest farmers cultivate it for better market access, noting its drought resistance and potential for good returns.