छत्रपती संभाजीनगर :
अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांतून मराठवाड्यासाठी गोदावरी नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्यात ७ टक्के कपात करण्याची शिफारस गोदावरी अभ्यास गटाच्या अहवालात करण्यात आली आहे.
ती स्वीकारू नये, अशी मागणी मराठवाडा हक्क बचाव समितीच्या वतीने जिल्हाधिकारी आणि गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक यांच्याकडे मंगळवारी करण्यात आली.
यावेळी समितीने गोदावरी अभ्यास गटाच्या अहवालावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे एक हजार लेखी आक्षेप सुपूर्द केले. अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून मराठवाड्याला देण्यात येणाऱ्या पाण्यात ७ टक्के कपात करण्याची शिफारस गोदावरी अभ्यास गटाने शासनास केली आहे.
हा अहवाल शासनाने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे पुढील कार्यवाहीसाठी दिला आहे. प्राधिकरणाने या अहवालावर १५ एप्रिलपर्यंत हरकती, आक्षेप मागविले होते. अहवालाविरोधात कालपर्यंत सुमारे चार हजार आक्षेप दाखल झाले आहेत.
मराठवाडा हक्क बचाव समितीच्या शिष्टमंडळाने प्रा. चंद्रकांत भराट यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि गोदावरी मराठवाडा पाटबंधारे १५ एप्रिलपर्यंत हरकती, आक्षेप मागविण्यात आले होते. या कालावधीत चार हजारांपेक्षा अधिक आक्षेप दाखल करण्यात आले आहेत.
विभागाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांची भेट घेतली. यावेळी पाणीकपातीची शिफारस असलेला एकतर्फी अहवाल स्वीकारू नये अशी मागणी करणारे १ हजार शेतकऱ्यांचे आक्षेप सुपूर्द केले.
एकतर्फी अहवाल रद्द करावा, मराठवाड्याला नेहमीप्रमाणे हक्काचे समन्यायी पाणी वाटप करावे, न्यायालयाचा व कायद्याचा आदर करावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी प्रा. चंद्रकांत भराट, विजय काकडे, अमित पाटील, सुधाकर शिंदे, आकाश जोशी आदींची उपस्थिती होती.जिल्ह्यात १३५ मराठवाड्यात १८४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
१३९ गावे आणि वाड्यांची टँकर तहान भागवणार
* छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक १३५ टँकरने ९३ गावे आणि १२ वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे.
*जालना जिल्ह्यात २४ गावे आणि ७ वाड्यांना ४७ टँकरने, तर नांदेड जिल्ह्यात २ टँकरने पाणीपुरवठा आहे.
टंचाईच्या झळा : मराठवाडा तहानला
* मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला यंदाचा उन्हाळा जड चालला आहे. पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा जिल्ह्यातील ग्रामीण भागाला बसू लागल्या आहेत.
* अजून दीड महिना पावसाळ्यासाठी असून एप्रिल मध्यानानंतर जिल्ह्यातील जलस्त्रोतांवर वाढत्या तापमानाचा परिणाम झाल्याने टँकरची मागणी वाढत आहे. २०६ अधिग्रहित मराठवाड्यातील जिल्हा प्रशासनाकडून २०६ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
* विहिरीतील पाणी टँकर भरण्यासाठी वापरले जात आहे. टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहेत.
जिल्हा | टँकरची संख्या | अधिग्रहित विहिरी |
छ. संभाजीनगर | १३५ | ७८ |
जालना | ४७ | ४२ |
हिंगोली | ०० | ४४ |
नांदेड | ०२ | ३६ |
बीड | ०० | ०३ |
लातूर | ०० | ०१ |
धाराशिव | ०० | ०२ |
एकूण | १८४ | २०६ |