Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > राज्यात महारेशीम अभियानाला मुदतवाढ; आता रेशीम योजनांसाठी किती तारखेपर्यंत करू शकता अर्ज?

राज्यात महारेशीम अभियानाला मुदतवाढ; आता रेशीम योजनांसाठी किती तारखेपर्यंत करू शकता अर्ज?

Mahareshim Abhiyan extended in the state; Now till what date can you apply for silk schemes? | राज्यात महारेशीम अभियानाला मुदतवाढ; आता रेशीम योजनांसाठी किती तारखेपर्यंत करू शकता अर्ज?

राज्यात महारेशीम अभियानाला मुदतवाढ; आता रेशीम योजनांसाठी किती तारखेपर्यंत करू शकता अर्ज?

ऑनलाईन तुती लागवडीसाठी नाव नोंदणी करणे करीता तांत्रीक अडचणी येत असल्याने महारेशीम अभियान २०२६ राबवितांना लक्षांक पुर्ततेवर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसुन येत आहे.

ऑनलाईन तुती लागवडीसाठी नाव नोंदणी करणे करीता तांत्रीक अडचणी येत असल्याने महारेशीम अभियान २०२६ राबवितांना लक्षांक पुर्ततेवर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसुन येत आहे.

रेशीम उद्योग हा कृषि व वन संपत्तीवर आधारित रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला उद्योग आहे. महाराष्ट्रातील हवामान या उद्योगास पोषक असल्यामुळे रेशीम उत्पादन करण्यास राज्यात भरपूर वाव आहे.

राज्याचा कृषि विकास दर वृध्दीबरोबर ग्रामीण भागातील जनतेचा आर्थिकस्तर व जीवनमान उंचावण्यास मदत करणारा हा उद्योग आहे.

महारेशीम अभियानास शेतकऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून रेशीम शेतीचा प्रचार व प्रसिध्दी होवून रेशीम उद्योग लोकाभिमुख होण्यास मदत मिळाली आहे.

त्या अनुषंगाने संचालक (रेशीम) यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार सन २०२६ मध्ये तुती लागवड व टसर रेशीम लाभार्थ्यांची नाव नोंदणी करण्यासाठी दि. ४ फेब्रुवारी २०२६ पासून ते दि. ११ मार्च २०२६ या कालावधीत महारेशीम अभियान-२०२६ राबविण्यास मान्यता दिली होती.

परंतु सदर अभियान कालावधीत मनरेगा योजने अंतर्गत कंत्राटी कर्मचारी दि.२७.०१.२०२६ ते दि.१२.०२.२०२६. पर्यंत संपावर असल्याने तसेच संचालनालयांतर्गत संपुर्ण राज्यभरात अत्यल्प तांत्रीक कर्मचारी आस्थापनेवर होते.

त्यामुळे त्यांना अभियानाव्यतीरीक्त शेतकऱ्यांना तांत्रीक मार्गदर्शन करणे, अंडीपुंज मागणी व पुरवठा करणे, क्षेत्रीय भेटी देणे, कार्यालयीन नियमित कामे करणे मनरेगा अंतर्गत मस्टर संबंधातील सपूर्ण कामकाज वेळेत करणे गरजेचे आहे.

ऑनलाईन तुती लागवडीसाठी नाव नोंदणी करणे करीता तांत्रीक अडचणी येत असल्याने महारेशीम अभियान २०२६ राबवितांना लक्षांक पुर्ततेवर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसुन येत आहे.

सबब राज्याचा निर्धारीत लक्षांक साध्य करणे करीता राज्यभरात मोठ्या प्रमाणात नवीन तुती लागवड नाव नोंदणी शिबीरे नियोजीत केलेले असल्याने महारेशीम अभियान २०२६ राबविणेस मुदतवाढ देण्याचे शासनाच्या विचाराधीन होते.

राज्यातील रेशीम शेतीचे महत्व व त्यातून मिळणाऱ्या हमखास व शाश्वत उत्पन्नाची शेतकऱ्यांना माहिती व्हावी याकरिता प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी तसेच, सन २०२६ मध्ये तुती लागवड व टसर रेशीम लाभार्थ्यांची नाव नोंदणी करण्यासाठी दि.०५.०४.२०२६ मुदतवाढ दिली आहे.

सदर अभियानात समाविष्ट जिल्हे
बीड, जालना, नांदेड, हिंगोली, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा, नागपुर, वर्धा, चंद्रपुर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराधीव व लातूर इ.

अधिक वाचा: शेतजमिनीच्या पोटहिश्शाची मोजणी मोफत होणार; आता दहा गुंठ्यांचाही नकाशा मिळणार

Web Title : महाराष्ट्र में महारेशम अभियान की समय सीमा बढ़ी, रेशम योजनाओं के लिए आवेदन करें

Web Summary : महाराष्ट्र ने रेशम उत्पादन को बढ़ावा देने के लिए महारेशम अभियान की समय सीमा 5 अप्रैल, 2026 तक बढ़ा दी है। इससे किसानों को सूचीबद्ध जिलों में टसर रेशम और शहतूत की खेती योजनाओं के लिए पंजीकरण कराने के लिए अधिक समय मिलेगा। विस्तार तकनीकी मुद्दों और कर्मचारियों की कमी को दूर करता है।

Web Title : Maharashtra Extends Maha Reshim Campaign Deadline for Sericulture Scheme Applications

Web Summary : Maharashtra extends the Maha Reshim campaign deadline to April 5, 2026, to boost sericulture. This provides farmers more time to register for Tussah silk and mulberry cultivation schemes across listed districts. The extension addresses technical issues and staff shortages.