Lokmat Agro >शेतशिवार > Soybean Seeds : सोयाबीनने फोडली कोंडी; बुलढाण्याच्या शेतकऱ्यांनी गाठला विक्रमी टप्पा वाचा सविस्तर

Soybean Seeds : सोयाबीनने फोडली कोंडी; बुलढाण्याच्या शेतकऱ्यांनी गाठला विक्रमी टप्पा वाचा सविस्तर

latest news Soybean Seeds: Soybean breaks the deadlock; Buldhana farmers reach record level Read in detail | Soybean Seeds : सोयाबीनने फोडली कोंडी; बुलढाण्याच्या शेतकऱ्यांनी गाठला विक्रमी टप्पा वाचा सविस्तर

Soybean Seeds : सोयाबीनने फोडली कोंडी; बुलढाण्याच्या शेतकऱ्यांनी गाठला विक्रमी टप्पा वाचा सविस्तर

Soybean Seeds : 'महाबीज'च्या (Mahabeej) माध्यमातून राबविण्यात आलेल्या बीज प्रमाणीकरण कार्यक्रमाने बुलढाण्यात इतिहास रचला आहे. तब्बल १० हजार २२ शेतकऱ्यांच्या सहभागातून ५.४९ लाख क्विंटल बीजांचे उत्पादन झाले असून, सोयाबीनने दिला विक्रमी वाटा.(Soybean Seeds)

शेअर :

Join us
Join usNext

सन २०२४-२५ या वर्षासाठी 'महाबीज'च्या (Mahabeej) माध्यमातून राबविण्यात आलेल्या बीज प्रमाणीकरण कार्यक्रमाने बुलढाणा जिल्ह्यात नवा उच्चांक गाठला आहे.(Soybean Seeds)

जिल्ह्यातील एकूण १० हजार २२ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवत ५ लाख ४९ हजार ४४५ क्विंटल बीजांचे विक्रमी उत्पादन नोंदवले असून, यामध्ये सर्वाधिक ९७ टक्के उत्पादन हे सोयाबीन पिकाचे आहे. हा कार्यक्रम खरीप आणि रब्बी हंगामात यशस्वीरीत्या राबविण्यात आला आहे.(Soybean Seeds)

खरीप हंगामात सोयाबीनचे वर्चस्व

खरीप हंगामात एकूण ९ हजार ८१९ शेतकऱ्यांनी २३ लाख ४७२.९५ हेक्टर क्षेत्रावर बीजोत्पादन केले. यामधून ५ लाख ३९ हजार २४६ क्विंटल बीज मिळाले. त्यापैकी फक्त सोयाबीन पीकाचं योगदान ५ लाख ३४ हजार ६२७ क्विंटल इतकं आहे.

सोयाबीन लागवड : ९ हजार ५६० शेतकरी

एकूण क्षेत्र : २३ हजार १०४ हेक्टर

सरासरी उत्पादन क्षमता : २३ क्विंटल/हे.

इतर खरीप पिकांचे उत्पादन तपशील

पीकशेतकरीक्षेत्र (हे.)उत्पादन (क्विंटल)
उडीद८३१०३१,२११
मूग४३४०४३५
तूर१२३२१८.९४२,९०५
कापूस०.६०
कांदा५.६१५७
ताग०.८०

रब्बी हंगामातही शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रब्बी हंगामात थोडेसे कमी शेतकरी सहभागी झाले, मात्र २०३ शेतकऱ्यांनी २९९.१० हेक्टर क्षेत्रावर बीजोत्पादन करून १० हजार १९९ क्विंटल बीज निर्माण केले.

प्रमुख रब्बी पिकांचे उत्पादन तपशील

पीकशेतकरीक्षेत्र (हे.)उत्पादन (क्विंटल)
गहू१४९२६३.७९,८८२
कांदा३८१९.८९९
रब्बी ज्वारी३.२४८
मोहरी, राजमा, करडई--१७०

प्रशासनाचा यशस्वी उपक्रम; भविष्यासाठी दिशा

बुलढाणा जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या बीज प्रमाणीकरण कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना गुणवत्तायुक्त व स्थानिक हवामानाला अनुरूप बीज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट होते. कृषी विभाग, बीजप्रक्रिया केंद्रे आणि शेतकऱ्यांच्या सक्रिय सहभागामुळे हे उद्दिष्ट मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाले आहे.

या उपक्रमामुळे जिल्ह्याची बीजोत्पादनातील स्वयंपूर्णता वाढली असून, भविष्यात या योजनेचा आणखी विस्तार होण्याची गरजही जाणवते.

बुलढाण्याचा राज्यात बीजोत्पादनात आघाडीचा टप्पा

सोयाबीनने दिले ९७% योगदान

रब्बी हंगामातही यशस्वी प्रयत्न

शेतकऱ्यांचा वाढता सहभाग ही शाश्वत शेतीची दिशा दाखवणारा महत्त्वाचा टप्पा

जिल्ह्यात महाबीजकडून बिजोत्पादन कार्यक्रम घेतल्या जातो. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. - मनोजकुमार ढगे, कृषी अधिकारी.

हे ही वाचा सविस्तर : Agricultural Production : शेतीत उत्पादन वाढले, पण क्षेत्र घटले; जाणून घ्या कोणती पिकं पुढे! वाचा सविस्तर

Web Title: latest news Soybean Seeds: Soybean breaks the deadlock; Buldhana farmers reach record level Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.