Lokmat Agro >शेतशिवार > Rain Impact on Crops : नागपूर विभागात कोसळधारा; मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान वाचा सविस्तर

Rain Impact on Crops : नागपूर विभागात कोसळधारा; मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान वाचा सविस्तर

latest news Rain Impact on Crops: Torrential rain in Nagpur division; Large scale crop damage Read in detail | Rain Impact on Crops : नागपूर विभागात कोसळधारा; मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान वाचा सविस्तर

Rain Impact on Crops : नागपूर विभागात कोसळधारा; मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान वाचा सविस्तर

Rain Impact on Crops : जून महिना कोरडा गेला असला तरी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर विभागातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. (Rain Impact on Crops)

Rain Impact on Crops : जून महिना कोरडा गेला असला तरी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर विभागातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. (Rain Impact on Crops)

शेअर :

Join us
Join usNext

नागपूर : जून महिना कोरडा गेला असला तरी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर विभागातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. (Rain Impact on Crops)

अतिवृष्टीमुळे तब्बल ४२ हजार ६०० हेक्टर क्षेत्रातील पिकांचा चिखल झाला आहे. प्रशासनाने या नुकसानभरपाईसाठी ३७.७० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून, त्यापैकी १३.५६ कोटींची मंजुरी मिळाली आहे. (Rain Impact on Crops)

सर्वाधिक फटका चंद्रपूर-गडचिरोलीला

शासकीय आकडेवारीनुसार चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक १४,१०५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, त्यानंतर गडचिरोलीत १०,९१२ हेक्टर, वर्ध्यात ९,०९१ हेक्टर, नागपूरमध्ये ५,६४४ हेक्टर, भंडाऱ्यात २,५८९ हेक्टर आणि गोंदियामध्ये २५८ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे.

जिल्हानिहाय बाधित क्षेत्र व नुकसानभरपाई मागणी

जिल्हाबाधित क्षेत्र (हेक्टर)मागणी (कोटी)मंजूर (कोटी)
नागपूर५६४४.०१४.९०३.९२
वर्धा९०९१.३९८.०१२.३०
चंद्रपूर१४,१०५.७४७.३३७.३३
गडचिरोली१०,९१२.७३१२.९०
गोंदिया२५८.३२२.३४
भंडारा२५८९.१२४.३३

कोणत्या पिकांना बसला फटका?

भात पिक : गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर नासाडी

सोयाबीन व कापूस : अतिवृष्टी व पूरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान

फळपिके : नागपूर जिल्ह्यात संत्रा व मोसंबी तर मिरची पिकालाही फटका

पूरस्थितीमुळे अनेक ठिकाणी जमिनी खरडून गेल्या असून, पेरणीनंतर उगवलेली पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

पंचनामे सुरूच

सप्टेंबर महिन्यातील नुकसानाचे पंचनामे अद्याप सुरू आहेत. पिकांच्या नुकसानीची अंतिम आकडेवारी मिळाल्यानंतर शासनाकडून अतिरिक्त मदतीचे प्रस्तावही पाठविले जाणार आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

एकूणच, पावसाच्या थैमानामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक संकट भेडसावले असून, शासनाकडून मिळणाऱ्या मदतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा सविस्तर : Kharif Shivar Feri Akola : कृषी तंत्रज्ञानाचा जागर: प्रगत तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी उपयुक्त वाचा सविस्तर

Web Title: latest news Rain Impact on Crops: Torrential rain in Nagpur division; Large scale crop damage Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.