Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Pik Karj Mafi : पीक कर्जमाफीचा गोंधळ; लाभ नेमका कोणाला, कोण राहणार वंचित?

Pik Karj Mafi : पीक कर्जमाफीचा गोंधळ; लाभ नेमका कोणाला, कोण राहणार वंचित?

latest news Pik Karj Mafi : Confusion over crop loan waiver; Who exactly will benefit, who will remain deprived? | Pik Karj Mafi : पीक कर्जमाफीचा गोंधळ; लाभ नेमका कोणाला, कोण राहणार वंचित?

Pik Karj Mafi : पीक कर्जमाफीचा गोंधळ; लाभ नेमका कोणाला, कोण राहणार वंचित?

Pik Karj Mafi : पीक कर्जमाफीची घोषणा झाली असली तरी लाभ नेमका कोणाला मिळणार आणि कोण वंचित राहणार, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.(Pik Karj Mafi)

Pik Karj Mafi : पीक कर्जमाफीची घोषणा झाली असली तरी लाभ नेमका कोणाला मिळणार आणि कोण वंचित राहणार, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.(Pik Karj Mafi)

Pik Karj Mafi : राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलेल्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना' अंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते.( Pik Karj Mafi)

मात्र खरीप हंगाम तोंडावर येऊनही या योजनेचे निकष स्पष्ट न झाल्याने कर्जमाफीची अंमलबजावणी रखडली असून, शेतकरी संभ्रमात सापडले आहेत.( Pik Karj Mafi)

खरीप तोंडावर, निर्णय मात्र प्रलंबित

फेब्रुवारी-मार्चमधील अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले होते.

परंतु प्रत्यक्षात खरीप हंगामाची सुरुवात होत असतानाही कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर

दरवर्षी सुमारे १ लाख ७० हजार शेतकरी खरीप हंगामात कर्ज घेतात

एकूण कर्जउचल : अंदाजे १,५०० रु. कोटी

६७,०८४ शेतकरी NPA मध्ये

थकीत कर्ज : ३३९.५० रु. कोटी

मोठ्या प्रमाणावर शेतकरी कर्जबाजारी असल्याने कर्जमाफीची अपेक्षा अधिक आहे.

नव्या कर्जावरही परिणाम

थकीत कर्जामुळे अनेक शेतकरी NPA (Non-Performing Asset) यादीत गेले आहेत. त्यामुळे त्यांना नव्याने पीक कर्ज मिळण्याचा मार्ग बंद झाला आहे. परिणामी खरीप हंगामासाठी आवश्यक भांडवल उभारणे कठीण झाले आहे.

निकष अस्पष्ट; शेतकरी संभ्रमात

कर्जमाफीची घोषणा झाली असली तरी

पात्रता निकष काय असतील?

कोणत्या कर्जाचा समावेश होणार?

प्रक्रिया कशी राबवली जाणार?

या बाबी अद्याप स्पष्ट नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

आशेवर पाणी?

कर्जमाफीची अपेक्षा ठेवून अनेक शेतकऱ्यांनी पुढील आर्थिक नियोजन केले होते. मात्र निर्णय लांबल्याने त्यांच्या आशेवर पाणी फिरण्याची भीती व्यक्त होत आहे.

खरीप हंगामाच्या तोंडावरच कर्जमाफीच्या निकषांबाबत अनिश्चितता असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन विस्कळीत झाले आहे.

शासनाने तातडीने निकष जाहीर करून योजना अंमलात आणण्याची गरज असून, अन्यथा हजारो शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा सविस्तर : Pik Karja : शेतकरी अडचणीत! कर्जमाफी नाही, खत दर वाढले; आता काय करणार?

अधिक वाचा : Heat Wave Impact : उष्णतेचा शेतीवर मोठा परिणाम; शेतकऱ्यांची वेळच बदलली!

Web Title : किसान ऋण माफी भ्रम: किसे लाभ, कौन रहेगा वंचित?

Web Summary : महाराष्ट्र की ऋण माफी योजना अस्पष्ट मानदंडों के कारण विलंबित, किसान अनिश्चित। कई एनपीए में हैं, खरीफ सीजन के लिए नए ऋण बाधित। घोषणा के बाद आशान्वित किसान अब वित्तीय व्यवधान का सामना कर रहे हैं, समय सीमा बिना स्पष्टता के करीब, हजारों प्रभावित।

Web Title : Farmer loan waiver confusion: Who benefits, and who remains excluded?

Web Summary : Maharashtra's loan waiver scheme faces delays due to unclear criteria, leaving farmers uncertain. Many are in NPA, hindering new loans for the upcoming Kharif season. Farmers, hopeful after the initial announcement, now face financial disruption as the deadline approaches without clarity, potentially impacting thousands.