Lokmat Agro >शेतशिवार > Marathwada Rain Update : मराठवाड्यात पावसाचा तडाखा; ३.५८ लाख हेक्टरवरील पिके पाण्याखाली! वाचा सविस्तर

Marathwada Rain Update : मराठवाड्यात पावसाचा तडाखा; ३.५८ लाख हेक्टरवरील पिके पाण्याखाली! वाचा सविस्तर

latest news Marathwada Rain Update: Heavy rains in Marathwada; Crops on 3.58 lakh hectares under water Read in detail | Marathwada Rain Update : मराठवाड्यात पावसाचा तडाखा; ३.५८ लाख हेक्टरवरील पिके पाण्याखाली! वाचा सविस्तर

Marathwada Rain Update : मराठवाड्यात पावसाचा तडाखा; ३.५८ लाख हेक्टरवरील पिके पाण्याखाली! वाचा सविस्तर

Marathwada Rain Update : मराठवाड्यात पावसाने गेल्या पाच दिवसांत हाहाकार माजवला आहे. पिके पाण्याखाली, घरे उद्ध्वस्त, जनावरे दगावली आणि जीवितहानीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या संकटाचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला बसला असून प्रशासनावर तातडीने मदत देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.(Marathwada Rain Update)

Marathwada Rain Update : मराठवाड्यात पावसाने गेल्या पाच दिवसांत हाहाकार माजवला आहे. पिके पाण्याखाली, घरे उद्ध्वस्त, जनावरे दगावली आणि जीवितहानीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या संकटाचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला बसला असून प्रशासनावर तातडीने मदत देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.(Marathwada Rain Update)

शेअर :

Join us
Join usNext

Marathwada Rain Update : मराठवाड्यात पावसाने गेल्या पाच दिवसांत हाहाकार माजवला आहे. पिके पाण्याखाली, घरे उद्ध्वस्त, जनावरे दगावली आणि जीवितहानीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.(Marathwada Rain Update)

या संकटाचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला बसला असून प्रशासनावर तातडीने मदत देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.(Marathwada Rain Update)

मागील पाच दिवसांपासून (१४ ते १९ ऑगस्ट) मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला असून अतिवृष्टी, पूरस्थिती व धरणातून केलेल्या विसर्गामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.(Marathwada Rain Update)

या आपत्तीमध्ये तब्बल १३ जणांचा मृत्यू झाला असून, ४ लाख ३८ हजार शेतकरी बाधित झाले आहेत. तसेच ३ लाख ५८ हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.(Marathwada Rain Update)

शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

बाधित शेतकरी : ४,३८,३५१

शेतीपिकांचे नुकसान : ३,५८,३७० हेक्टर

जिरायत पिकांचे सर्वाधिक नुकसान, तर बागायत आणि फळपिकेही वाहून गेली.

नांदेडला सर्वाधिक फटका

या आपत्तीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला बसला आहे. येथे एकट्या ९४९ गावे बाधित झाली असून ७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. बीडमध्ये ३, तर हिंगोलीत २ जणांचा मृत्यू झाला आहे.

जनावरांचे मोठे नुकसान

पावसामुळे ४९८ जनावरे दगावली, यात लातूरमध्ये सर्वाधिक २४५ तर नांदेडमध्ये १२६ जनावरांचा समावेश आहे. गाई-म्हशींसह दुधाळ जनावरांचे प्रमाण जास्त असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे.

५८८ कुटुंबांचा संसार उघड्यावर

अतिवृष्टीमुळे ५८८ घरे व गोठ्यांची पडझड झाली आहे. सर्वाधिक २७५ घटना नांदेड जिल्ह्यात घडल्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये ६३, लातूर ८२ तर धाराशिवमध्ये ६४ घरे उद्ध्वस्त झाली आहेत.

धरणे ओव्हरफ्लो, वाहतूक ठप्प

बीड जिल्ह्यातील मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने सहा दरवाजे उघडावे लागले. निम्न दुधना धरणातूनही विसर्ग सुरू असून परभणीतील राजवाडी पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली. याच पुलावरून दुचाकीसह गेलेल्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मृतांचा आकडा चिंताजनक

मराठवाड्यातील या पावसात गेल्या पाच दिवसांत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी नांदेड जिल्ह्यात ७, बीडमध्ये ३, हिंगोलीत २ तर परभणीत १ व्यक्तीचा बळी गेला. काही जण पुराच्या पाण्यात वाहून गेले, तर काही जण धबधब्यात पोहताना बुडाले.

पंचनाम्याची प्रतीक्षा

प्रशासनाने हा अहवाल प्राथमिक असल्याचे सांगितले आहे. मात्र अजूनही पंचनामे सुरू झालेले नाहीत. शेतकरी चिंताग्रस्त असून तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी होत आहे.

हे ही वाचा सविस्तर : Marathwada Rain Update : मराठवाड्यात धो-धो पाऊस; हजारो एकर शेतीचे नुकसान

Web Title: latest news Marathwada Rain Update: Heavy rains in Marathwada; Crops on 3.58 lakh hectares under water Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.