Lokmat Agro >शेतशिवार > Marathawada Rain: १७ दिवसांच्या अवकाळी पावसाने मराठवाड्यात हाहाकार! वाचा सविस्तर हानीचा अहवाल

Marathawada Rain: १७ दिवसांच्या अवकाळी पावसाने मराठवाड्यात हाहाकार! वाचा सविस्तर हानीचा अहवाल

latest news Marathawada Rain :17 days of unseasonal rains wreak havoc in Marathwada! Read the detailed damage report. | Marathawada Rain: १७ दिवसांच्या अवकाळी पावसाने मराठवाड्यात हाहाकार! वाचा सविस्तर हानीचा अहवाल

Marathawada Rain: १७ दिवसांच्या अवकाळी पावसाने मराठवाड्यात हाहाकार! वाचा सविस्तर हानीचा अहवाल

Marathawada Rain : मराठवाडा (Marathawada) परिसरात गेल्या १७ दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rains) थैमान घातले आहे. वादळी वाऱ्यांसह झालेल्या या पावसामुळे अनेक घरांचे छप्पर उडाले, विजेचे खांब पडले, झाडे उन्मळून गेली, जनावरे मृत्युमुखी पडली, तर शेतीपिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वाचा सविस्तर (Unseasonal Rains)

Marathawada Rain : मराठवाडा (Marathawada) परिसरात गेल्या १७ दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rains) थैमान घातले आहे. वादळी वाऱ्यांसह झालेल्या या पावसामुळे अनेक घरांचे छप्पर उडाले, विजेचे खांब पडले, झाडे उन्मळून गेली, जनावरे मृत्युमुखी पडली, तर शेतीपिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वाचा सविस्तर (Unseasonal Rains)

शेअर :

Join us
Join usNext

Marathawada Rain : मराठवाडा (Marathawada) परिसरात गेल्या १७ दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rains) थैमान घातले आहे. या काळात वीज कोसळून २७ नागरिकांचा मृत्यू झाला असून २१ जण जखमी झाले आहेत. (Unseasonal Rains)

तसेच ३९१ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. ४ हजार हेक्टरहून अधिक शेतीचे नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. (Marathawada Rain)

मे महिन्याच्या सुरुवातीपासून शेतकऱ्यांनी खरिपासाठी मशागत सुरू केली होती. मात्र, ३ मेपासून अचानक ढगांची गर्दी, वीजांचा कडकडाट आणि सततचा पाऊस सुरू झाला. परिणामी शेतकरी संकटात सापडले आहेत. (Unseasonal Rains)

वादळी वाऱ्यांसह झालेल्या या पावसामुळे अनेक घरांचे छप्पर उडाले, विजेचे खांब पडले, झाडे उन्मळून गेली, जनावरे मृत्युमुखी पडली, तर शेतीपिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. (Unseasonal Rains)

काही ठिकाणी विजेच्या धक्क्याने जीवितहानी झाली असून, अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. (Unseasonal Rains)

मराठवाड्यातील विविध भागांमध्ये घरांची पडझड, जनावरे दगावणे, आणि शेतीच्या मोठ्या प्रमाणावर नुकसानीच्या घटना घडल्या.

बीड व परभणी जिल्ह्यांमध्ये वादळामुळे घरांची पडझड झाली असून एकूण ८४ घरांचे नुकसान, तर ५९७ गावांमध्ये अवकाळीचा फटका बसला आहे.

मंगळवारी (दि. २०) गंगापूर, कन्नड, वैजापूर, पैठण, सिल्लोड आणि इतर तालुक्यांत पावसाचा तडाखा बसला. गंगापूर शहरात अनेक घरांवरील पत्रे उडाली, वीज खांब पडले आणि रात्रीभर वीजपुरवठा खंडित राहिला. शेतशिवारातील फळबागांना देखील मोठा फटका बसला आहे.

पैठण तालुक्यातील लामगव्हाण शिवारात विजेचा शॉक लागून प्रियांका काळे या २५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्या पतीसोबत पाल उभारताना लोखंडी खूंटी ठोकत असताना ही दुर्दैवी घटना घडली.

कन्नड तालुक्यात विजेच्या धक्क्याने दोन शेळ्यांचा मृत्यू झाला. याशिवाय १८ घरांवरील पत्रे उडाले.

शिऊर शिवारात वादळी वाऱ्यामुळे जनावरांच्या शेडचे पत्रे उडाले व एक गाय गंभीर जखमी झाली.

आडगाव (पि.) येथे लग्नमंडप उडाल्याने लग्नसामग्री व स्वयंपाकाचे नुकसान झाले. विजेच्या धक्क्याने एका बैलाचा मृत्यू झाला.

फुलंब्री, कन्नड, पैठण आणि वैजापूर तालुक्यांत १६-१९ मिमी पावसाची नोंद झाली. काही भागांत नदी-नाल्यांना पूर आला.

शेती पिकांचे मोठे नुकसान

* परिसरातील बाभळीची झाडे, डाळिंब, केळी, अंबा फळबागांसह टोमॅटो, कांदा, बाजरी अशा अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

* अनेक शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर झाडे पडली. काही भागांत शेडमध्ये ठेवलेले बियाणे पाण्यात वाहून गेले.

* वादळामुळे घरांचे छप्पर उडाल्याने नागरिकांना उघड्यावर रात्र काढावी लागली. अनेक भागांत अजूनही वीजपुरवठा खंडित आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. (Marathawada Rain)

वीज कोसळून कोणत्या जिल्ह्यात किती मृत्यू ?

जिल्हामृत्यूंची संख्या
जालना
बीड
नांदेड
छत्रपती संभाजीनगर
हिंगोली
लातूर
धाराशिव
परभणी
एकूण२७

असे झाले शेतीचे नुकसान (हेक्टरमध्ये)

पीकप्रकारनुकसान (हेक्टर)
जिरायत पिके२५१
बागायती पिके१,८८४
फळबागा२,०८२
एकूण४,२१७

हे ही वाचा सविस्तर : Farmers Safety: वीज कोसळताना... एक चुकीचे पाऊल, जीवावर बेतू शकतो! वाचा सविस्तर

Web Title: latest news Marathawada Rain :17 days of unseasonal rains wreak havoc in Marathwada! Read the detailed damage report.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.