Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > PM Gharkul Yojana : घरकूल लाभार्थ्यांसाठी गुड न्यूज, सरकारकडून बांधकामासाठी रेती वितरण, पहा संपूर्ण प्रक्रिया 

PM Gharkul Yojana : घरकूल लाभार्थ्यांसाठी गुड न्यूज, सरकारकडून बांधकामासाठी रेती वितरण, पहा संपूर्ण प्रक्रिया 

Latest news Good news for Gharkool beneficiaries, government distributes sand for construction, see the complete process | PM Gharkul Yojana : घरकूल लाभार्थ्यांसाठी गुड न्यूज, सरकारकडून बांधकामासाठी रेती वितरण, पहा संपूर्ण प्रक्रिया 

PM Gharkul Yojana : घरकूल लाभार्थ्यांसाठी गुड न्यूज, सरकारकडून बांधकामासाठी रेती वितरण, पहा संपूर्ण प्रक्रिया 

PM Gharkul Yojana : घरकुल लाभार्थी, स्थानिक नागरिक यांच्यासाठी शासकीय बांधकामांसाठी रेती आरक्षित करण्यात आली आहे.

PM Gharkul Yojana : घरकुल लाभार्थी, स्थानिक नागरिक यांच्यासाठी शासकीय बांधकामांसाठी रेती आरक्षित करण्यात आली आहे.

PM Gharkul Yojana :  बांधकामासाठी रेतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या घरकूल लाभार्थ्यांसाठी गुड न्यूज आहे. सरकारच्या निर्णयानुसार घरकुल लाभार्थी, स्थानिक नागरिक तसेच ग्रामपंचायत क्षेत्रातील शासकीय बांधकामांसाठी रेती आरक्षित करण्यात आली आहे. तालुक्यातील विविध रेतीघाटांमधून रेती वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महाखनिज प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने रेती उपलब्ध करून देण्यात येत आहे.

लाभार्थ्यांनी नियमानुसार प्रक्रिया पूर्ण करून रेती उचल करण्याचे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे. दरम्यान, अनुज्ञेय रेतीचा गैरवापर अथवा इतरांना हस्तांतरण केल्यास संबंधितांविरुद्ध दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा तहसीलदार प्राजक्ता बुरांडे दिला आहे. घरकुल लाभार्थी, स्थानिक नागरिक तसेच ग्रामपंचायत क्षेत्रातील शासकीय कामांसाठी रेती पुरवठा करण्याची कार्यवाही प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. यासाठी ऑनलाइन प्रणालीचा वापर करण्यात येत आहे.

लाभार्थ्यांना महाखनिज प्रणालीद्वारे प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. प्रशासनाने नागरिकांना नियमांचे पालन करूनच रेती उचल करण्याचे आवाहन केले आहे. पंचायत समिती मोहाडीमार्फत प्राप्त झालेली घरकुल लाभार्थ्यांची यादी महाखनिज प्रणालीशी जोडण्यात आली आहे. संबंधित यादी रेतीघाट धारकांकडेही पाठविण्यात आली आहे. लाभार्थ्यांनी तलाठी कार्यालयातून आपले नाव तपासून घ्यावे. आधार क्रमांक पडताळणी लवकरात लवकर पूर्ण करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ऑनलाइन पडताळणी करणे अनिवार्य
लाभार्थ्यांनी आधार लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे प्रक्रियेत सहभागी होऊन ऑनलाइन पडताळणी करणे अनिवार्य आहे. तसेच रेती उचलण्यासाठी जीपीएस युक्त ट्रॅक्टर अथवा ट्रकची व्यवस्था स्वतः करावी लागणार आहे. रेती उचल करताना मोबाईल क्रमांक, आधार माहिती व अन्य आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील.

रेतीचा गैरवापर अथवा इतर व्यक्तींना हस्तांतरण केल्याचे निदर्शनास आल्यास कायद्यांनुसार संबंधितांवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार प्राजक्ता बोराडे यांनी दिली आहे.

 

 Pik Karj : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मोठा दिलासा, पीक कर्जासाठी 'ती' अट रद्द, कोटी रुपये वाचणार

 

Web Title : पीएम घरकुल योजना: लाभार्थियों के लिए रेत वितरण शुरू; प्रक्रिया जांचें।

Web Summary : पीएम घरकुल योजना के लाभार्थियों के लिए खुशखबरी! सरकार ने महाखनिज प्रणाली के माध्यम से निर्माण के लिए रेत वितरण शुरू कर दिया है। लाभार्थियों को ऑनलाइन प्रक्रिया पूरी करनी होगी और नियमों का पालन करना होगा। गैर-अनुपालन पर जुर्माना लगेगा। सत्यापन और जीपीएस-युक्त वाहन अनिवार्य हैं।

Web Title : PM Gharkul Yojana: Sand distribution for beneficiaries starts; check the process.

Web Summary : Good news for PM Gharkul Yojana beneficiaries! The government has started sand distribution for construction through the Mahakhanij system. Beneficiaries must complete the online process and follow regulations. Non-compliance will result in penalties. Verification and GPS-equipped vehicles are mandatory.