Lokmat Agro >शेतशिवार > Crop Damage : तीन महिन्यांत पाच लाख हेक्टरवरील पिकांची माती; पंचनाम्यांची गती मंदावली वाचा सविस्तर

Crop Damage : तीन महिन्यांत पाच लाख हेक्टरवरील पिकांची माती; पंचनाम्यांची गती मंदावली वाचा सविस्तर

latest news Crop Damage: Crop soil on five lakh hectares in three months; Panchnamas slow down, read in detail | Crop Damage : तीन महिन्यांत पाच लाख हेक्टरवरील पिकांची माती; पंचनाम्यांची गती मंदावली वाचा सविस्तर

Crop Damage : तीन महिन्यांत पाच लाख हेक्टरवरील पिकांची माती; पंचनाम्यांची गती मंदावली वाचा सविस्तर

Crop Damage : मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. अतिवृष्टीमुळे १८३२ गावं जलमय, शेतकऱ्यांचे सुमारे ५ लाख हेक्टरवरील पिकं मातीमोल, तर पंचनाम्यांचे फक्त ५० टक्के काम पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत ३७ जणांचा बळी गेला असून शेकडो जनावरे दगावली आहेत. सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला बसला आहे. (Crop Damage)

Crop Damage : मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. अतिवृष्टीमुळे १८३२ गावं जलमय, शेतकऱ्यांचे सुमारे ५ लाख हेक्टरवरील पिकं मातीमोल, तर पंचनाम्यांचे फक्त ५० टक्के काम पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत ३७ जणांचा बळी गेला असून शेकडो जनावरे दगावली आहेत. सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला बसला आहे. (Crop Damage)

शेअर :

Join us
Join usNext

Crop Damage : मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. अतिवृष्टीमुळे १८३२ गावं जलमय, शेतकऱ्यांचे सुमारे ५ लाख हेक्टरवरील पिकं मातीमोल, तर पंचनाम्यांचे फक्त ५० टक्के काम पूर्ण झाली आहेत.(Crop Damage)

आतापर्यंत ३७ जणांचा बळी गेला असून शेकडो जनावरे दगावली आहेत. सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला बसला आहे. मराठवाड्यात यंदा पावसाचे वितरण विस्कळीत झाल्याने खरीप हंगामातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. (Crop Damage)

काही भागांत अतिवृष्टी तर काही भागांत अत्यल्प पाऊस पडल्यामुळे १ जूनपासून आतापर्यंत १८३२ गावांतील तब्बल ४ लाख ६२ हजार ६४२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. येत्या काही दिवसांत हा आकडा ५ लाख हेक्टरच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. (Crop Damage)

पंचनाम्यांची संथ गती

महसूल विभागाकडून पंचनाम्यांचे काम संथ गतीने सुरू आहे. आजवर केवळ ५० टक्केच पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित काम अजून प्रलंबित आहे. शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत असताना यंत्रणेच्या कामकाजावर टीका होत आहे.

जिल्हानिहाय पिकांचे नुकसान (हेक्टरमध्ये)

छत्रपती संभाजीनगर : ५,२८८

जालना : १९,१५५

परभणी : ९०,०६२

हिंगोली : १,८२६

नांदेड : ३,४०,७३७

बीड : २,१६८

लातूर : २,३१६

धाराशिव : १,०६८

एकूण : ४,६२,६४२ हेक्टर

सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला बसला असून तब्बल ३.४० लाख हेक्टरवरील पिके पाण्यात गेली आहेत.

मानवी व प्राणीहानीही मोठी

३७ जणांचा मृत्यू (नांदेड – १५, छत्रपती संभाजीनगर – ११, परभणी – ४, हिंगोली – ३, जालना – २, धाराशिव – १)

८२७ जनावरे दगावली

१७३५ घरांची पडझड

४२ गोठ्यांचे नुकसान

पावसाचे दिवस (जून ते २५ ऑगस्टपर्यंत)

छत्रपती संभाजीनगर : ३६ दिवस (जून – ११, जुलै – १३, ऑगस्ट – १२)

जालना : ३६ दिवस (जून – १०, जुलै – १४, ऑगस्ट – १२)

बीड : २८ दिवस (जून – ८, जुलै – ८, ऑगस्ट – १२)

पावसाचे दिवस काहीसे वाढले असले तरी वितरण असमान असल्याने खरीप पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे.

बदलत्या पावसामुळे शेती संकटात

पावसाचे असमान वितरण व अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी यांसारखी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. 

अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली, तर काही भागांत पिकांना पाणी न मिळाल्याने उगवणच झाली नाही.

मराठवाड्यातील शेतकरी दुहेरी फटक्याला सामोरे जात आहेत. एकीकडे पावसाची असमानता, तर दुसरीकडे पंचनाम्यांची संथ गती. येत्या काही दिवसांत सरकारने वेगाने मदत केली नाही, तर शेतकऱ्यांचे संकट आणखी गहिरे होईल.

हे ही वाचा सविस्तर : Inspiring Farmer Story : पहिली गाय आयुष्यात टर्निंग पॉइंट ठरली, शेतकऱ्याने थेट बंगल्यावर.... वाचा सविस्तर

Web Title: latest news Crop Damage: Crop soil on five lakh hectares in three months; Panchnamas slow down, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.