Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > CM Solar Krishi Vahini Yojana : आता रात्री शेतात जाण्याची गरज नाही; 'या' शेतकऱ्यांना दिवसा मिळणार वीज

CM Solar Krishi Vahini Yojana : आता रात्री शेतात जाण्याची गरज नाही; 'या' शेतकऱ्यांना दिवसा मिळणार वीज

latest news CM Solar Krishi Vahini Yojana: Now there is no need to go to the fields at night; 'These' farmers will get electricity during the day | CM Solar Krishi Vahini Yojana : आता रात्री शेतात जाण्याची गरज नाही; 'या' शेतकऱ्यांना दिवसा मिळणार वीज

CM Solar Krishi Vahini Yojana : आता रात्री शेतात जाण्याची गरज नाही; 'या' शेतकऱ्यांना दिवसा मिळणार वीज

CM Solar Krishi Vahini Yojana : हिंगोली जिल्ह्यात 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०' अंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पांना मोठा वेग आला आहे. तब्बल १४ सौर ऊर्जा प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर असून यामधून ५० ते ६० मेगा वॅट वीज निर्मिती होणार आहे. वाहिनी विलगीकरणानंतर शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीजपुरवठा मिळणार असल्याने रात्रीच्या सिंचनाच्या समस्येतून मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.(CM Solar Krishi Vahini Yojana)

CM Solar Krishi Vahini Yojana : हिंगोली जिल्ह्यात 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०' अंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पांना मोठा वेग आला आहे. तब्बल १४ सौर ऊर्जा प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर असून यामधून ५० ते ६० मेगा वॅट वीज निर्मिती होणार आहे. वाहिनी विलगीकरणानंतर शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीजपुरवठा मिळणार असल्याने रात्रीच्या सिंचनाच्या समस्येतून मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.(CM Solar Krishi Vahini Yojana)

हिंगोली : शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध नसल्याने रात्रीच्या अंधारात जीव धोक्यात घालून पिकांना पाणी देण्याची वेळ येणाऱ्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.(CM Solar Krishi Vahini Yojana)

राज्य शासनाच्या 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०' अंतर्गत हिंगोली जिल्ह्यात सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांना वेग आला असून तब्बल १४ सौर ऊर्जा प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.(CM Solar Krishi Vahini Yojana)

या प्रकल्पांतून सुमारे ५० ते ६० मेगा वॅट वीज निर्मिती होणार असून, वाहिनी विलगीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे.(CM Solar Krishi Vahini Yojana)

दिवसा वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा

जिल्ह्यात अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळीच वीज मिळत होती.

त्यामुळे रात्री शेतात जाऊन मोटार सुरू करावी लागत होती

वन्यप्राणी आणि सर्पदंशाचा धोका वाढत होता

कमी दाबामुळे मोटारी जळण्याच्या घटना घडत होत्या

भारनियमनामुळे सिंचनाचे नियोजन विस्कळीत होत होते

या समस्यांवर उपाय म्हणून शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी वीजपुरवठा योजनेला प्राधान्य दिले आहे.

१४ सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीच्या अंतिम टप्प्यात

महावितरणच्या नांदेड परिमंडलाच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यात विविध तालुक्यांत सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जात आहेत. यापैकी सहा प्रकल्प आधीच पूर्ण होऊन कार्यान्वित झाले असून उर्वरित प्रकल्पांचे काम वेगाने सुरू आहे.

प्रकल्प सुरू असलेली प्रमुख ठिकाणे

पार्टी (बागल), वाईचोंडी, खिल्लार, साळवा, साळणा, गोरेगाव, घोरदडी, बोरजा, लिंबाळा (मक्ता), जवळा-पळशी, बोरजा (सावंत) या सर्व प्रकल्पांच्या माध्यमातून जिल्ह्यात सौर ऊर्जानिर्मितीची मोठी क्षमता निर्माण होत आहे.

५० ते ६० मेगा वॅट सौर ऊर्जा निर्मिती

या प्रकल्पांतून सुमारे ५० ते ६० मेगा वॅट वीज निर्मिती होणार आहे. वाहिनी विलगीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर शेतीसाठी स्वतंत्र दिवसा वीजपुरवठा व्यवस्था सुरू होणार असल्याने कृषिपंपधारकांना मोठा फायदा होईल.

तज्ज्ञांच्या मते दिवसा सिंचनामुळे उत्पादनक्षमता वाढेल

वीज अपघातांचे प्रमाण कमी होईल

डिझेल पंपावरील खर्च वाचेल

ग्रामीण वीज व्यवस्थेवरील ताण कमी होईल

प्रशासनाचा 'टास्क फोर्स'द्वारे पाठपुरावा

सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीदरम्यान जमीन, तांत्रिक प्रक्रिया आणि परवानग्यांसारखे अनेक अडथळे निर्माण झाले होते.

मात्र प्रशासनाने 'टास्क फोर्स'च्या माध्यमातून नियमित पाठपुरावा करून ही कामे गतीने पूर्णत्वाकडे नेली आहेत.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० काय आहे?

राज्य शासनाने कृषिपंपधारकांना दिवसा अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० सुरू केली आहे.

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

शेतीसाठी स्वतंत्र सौर वीजपुरवठा

दिवसा अखंडित वीज

भारनियमनात घट

पारंपरिक वीजेवरील अवलंबित्व कमी

पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मिती

ग्रामीण भागातील वीज समस्येतून सुटका होणार

हिंगोली जिल्ह्यात कमी-अधिक दाबाचा वीजपुरवठा, वारंवार खंडित होणारी वीज आणि भारनियमन या समस्या गंभीर बनल्या होत्या.

त्यामुळे पिकांचे नुकसान

सिंचनात अडथळे

विद्युत उपकरणांचे नुकसान

आर्थिक फटका अशा समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत होते.

आता सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ग्रामीण भागातील वीजपुरवठा अधिक स्थिर आणि विश्वासार्ह होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

दिवसा वीज मिळणार असल्याच्या अपेक्षेने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 'रात्री शेतात जाण्याची भीती कमी होईल आणि सिंचनाचे नियोजन व्यवस्थित करता येईल,' अशी प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

हरित ऊर्जेकडे जिल्ह्याची वाटचाल

सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे हिंगोली जिल्हा आता हरित ऊर्जेकडे वाटचाल करत असल्याचे चित्र दिसत आहे. भविष्यात शेती क्षेत्रासाठी सौर ऊर्जेचा वापर वाढल्यास वीजटंचाईच्या समस्येवर मोठ्या प्रमाणात मात करता येणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Agriculture News : खरीपाआधी खत विक्रेत्यांना झटका; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई

अधिक वाचा : Farmer ID Issue : लाखो शेतकऱ्यांचे 'फार्मर आयडी' अडकले; शासकीय योजनांचा लाभ थांबणार?

Web Title : सीएम सोलर कृषी वाहिनी योजना: किसानों को मिलेगी दिन में बिजली

Web Summary : हिंगोली के किसानों को सीएम सोलर कृषी वाहिनी योजना 2.0 से लाभ होगा। चौदह सौर परियोजनाएं जल्द ही पूरी होकर दिन में बिजली प्रदान करेंगी, जिससे खतरनाक रात की सिंचाई की आवश्यकता समाप्त हो जाएगी और जानवरों और अविश्वसनीय बिजली आपूर्ति से जोखिम कम होगा।

Web Title : CM Solar Krishi Vahini Yojana: Farmers to Get Daytime Electricity

Web Summary : Hingoli farmers will benefit from the CM Solar Krishi Vahini Yojana 2.0. Fourteen solar projects nearing completion will provide daytime electricity, ending the need for dangerous nighttime irrigation and reducing risks from animals and unreliable power supply.