Lokmat Agro >शेतशिवार > Awakali Paus: अवकाळीचा तडाखा: मराठवाड्यात ३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान वाचा सविस्तर

Awakali Paus: अवकाळीचा तडाखा: मराठवाड्यात ३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान वाचा सविस्तर

latest news Awakali Paus: Unseasonal rains: Crops damaged on 3 thousand hectares in Marathwada Read in detail | Awakali Paus: अवकाळीचा तडाखा: मराठवाड्यात ३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान वाचा सविस्तर

Awakali Paus: अवकाळीचा तडाखा: मराठवाड्यात ३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान वाचा सविस्तर

Awakali Paus : मे महिन्यात मेघगर्जनेसह वादळी अवकाळी पावसाने (Unseasonal Rains) मराठवाड्यात कहर केला आहे. एकीकडे खरिपाच्या तयारीला सुरूवात होत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या या हवामान बदलामुळे तब्बल ३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान (Crops Damaged) झाल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात दिसून आले आहे. (Awakali Paus)

Awakali Paus : मे महिन्यात मेघगर्जनेसह वादळी अवकाळी पावसाने (Unseasonal Rains) मराठवाड्यात कहर केला आहे. एकीकडे खरिपाच्या तयारीला सुरूवात होत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या या हवामान बदलामुळे तब्बल ३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान (Crops Damaged) झाल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात दिसून आले आहे. (Awakali Paus)

शेअर :

Join us
Join usNext

छत्रपती संभाजीनगर :  मे महिन्यात मेघगर्जनेसह वादळी अवकाळी पावसाने  (Unseasonal Rains) मराठवाड्यात कहर केला आहे. एकीकडे खरिपाच्या तयारीला सुरूवात होत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. (Awakali Paus)

या हवामान बदलामुळे तब्बल ३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान (Crops Damaged) झाल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात  दिसून आले आहे.  (Unseasonal Rains)

यात सर्वाधिक २ हजार हेक्टर जालना जिल्ह्यात पिकांचे नुकसान (Crops Damaged) झाले असून, तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याआधी एप्रिल महिन्यातही ३ हजार ०२६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते.  (Unseasonal Rains)

अवकाळी पावसाचा जोर

* मे महिन्याच्या १६ दिवसांपैकी १० दिवसांहून अधिक दिवस पाऊस झाला आहे.

* विभागात १ ते १६ मे दरम्यान सरासरी १४.९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

* छत्रपती संभाजीनगरसह लातूर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, धाराशिव जिल्ह्यांत पावसाचा मोठा फटका बसला.

पशुधनाला फटका

 * १ ते १६ मे दरम्यान विज पडून सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

* छत्रपती संभाजीनगर, नांदेडमध्ये प्रत्येकी २, बीडमध्ये १, लातूरमध्ये १ घटना

* विजेच्या झटक्याने २० हून अधिक जनावरे दगावली आहेत.

शेतीसह सौरऊर्जा साधनांचे नुकसान

* हिंगोली जिल्ह्यात वादळामुळे भुईमूग, भाजीपाला, फळझाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

* सेनगाव, वसमत, औंढा नागनाथ तालुक्यांमध्ये सौरऊर्जा प्लेटचेही नुकसान झाले आहे.

पावसाचा इशारा

* 'वनामकृ' विद्यापीठाच्या हवामान विभागाने येत्या चार दिवसात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांचा इशारा दिला आहे.

* आज (१७ मे) रोजी धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, परभणी येथे पावसाचा इशारा दिला आहे.

* १८ मे रोजी धाराशिव, लातूर, बीड, जालना या जिल्हांत पावसाची शक्यता आहे.

* १९-२० मे रोजी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हे ही वाचा सविस्तर :   Unseasonal Rain: अवकाळीच्या तडाख्याने 'ही' पिके झाली जमीनदोस्त वाचा सविस्तर

Web Title: latest news Awakali Paus: Unseasonal rains: Crops damaged on 3 thousand hectares in Marathwada Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.